हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गूगल एक मोठं कारवाई करण्याच्या तयारीत आहे. कमी दर्जाचे आणि नॉन-फंक्शनल ॲप्स गुगल प्ले स्टोअर वरून काढून टाकण्यात येणार आहेत. असे ॲप्स काढून टाकण्यासाठी Google ने 31 ऑगस्ट 2024 ही अंतिम मुदत दिली आहे. सध्या गुगल प्ले स्टोअरवर असे ॲप्स उपलब्ध आहेत, जे सध्या काम करत नाहीत. तसेच, काही ॲप्स अतिशय खराब गुणवत्तेत येतात, ज्यामुळे वापरकर्त्याचा अनुभव खराब होतो. याचमुळे अशा अँपना कायमच बंद करण्याचा निर्णय गुगलने घेतला आहे.
खरं तर कंपनीने स्पॅम आणि मिनिमम फंक्शनैलिटी धोरण अपडेट केले आहे, जेणेकरून ॲपची गुणवत्ता आणि त्याचा अनुभव सुधारता येईल. Google च्या नवीन पॉलीसी नुसार, कमी सामग्री असलेले आणि योग्यरित्या डिझाइन न केलेले ॲप्स काढून टाकले जातील. यामध्ये फक्त टेक्स्ट ॲप्स, सिंगल वॉलपेपर ॲप्स यांचा समावेश आहे. हे ॲप्स नीट इन्स्टॉल होत नसल्याच्या तसेच तसेच इंस्टॉलेशनवर क्रॅश असल्याच्या तक्रारी गुगल कडे आल्या होत्या. याशिवाय जे अँप यूजर्सना सर्वोत्तम आनंद देऊ शकले नाहीत असेही अँप गुगल कडून प्ले स्टोअर वरून हटवण्यात येतील .
Google ने आपल्या धोरण अपडेट दरम्यान सांगितले की, कोणतेही ॲप हे स्थिर, प्रतिसाद देणारे आणि यूजर्सना चांगला अनुभव देणार असावं. गुगल प्ले स्टोअरवर लिस्टेड असलेले अँप्स चांगल्या क्वालिटीचे असावे. यापूर्वी सुद्धा 2023 मध्ये, Google ने धोरण उल्लंघनाच्या आरोपाखाली Google Play Store प्लॅटफॉर्मवरून 22.8 लाख ॲप्स काढून टाकले होते. तसेच, 200,000 ॲप्सचे सबमिशन रद्द करण्यात आले.