आता Google Map द्वारे प्रवास होणार आणखी सोप्पा; लाँच होणार हे नवं फीचर्स

Google Map Address Descriptor
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | कोणत्याही अनोळखी ठिकाणी जाण्यासाठी सर्वजण Google Map चा वापर करतात. त्यामुळे जे डेस्टिनेशन सेट केले आहे. तेथे अगदी आरामात आणि व्यवस्थितपणे आपण पोहचतो. त्यामुळे लांबच्या आणि अनोळखी ठिकाणी किंवा शहरात जाताना आपण नेहमीच गुगल मॅप वापरतो. ग्राहकांचा वाढता पाठिंबा आणि गरज पाहून कंपनी सुद्धा गुगल मॅप मध्ये वेगवेगळे फीचर्स आणत असते. त्याचप्रमाणे याहीवेळी गुगलने असे फिचर आणले आहे ज्यामुळे प्रवाश्यांचा प्रवास हा अधिक सुसाट होणार आहे. तो कसा ते जाणून घेऊयात.

कोणते आहे हे फिचर?

गुगल नवीन वर्षात आपल्या वापरकर्त्यांसाठी ‘Address Descriptor’ नावाचे फिचर रोलआऊट करणार आहे. ज्यामुळे प्रवाश्यांचा प्रवास हा अधिक चांगला आणि सोपा होणार आहे. या फिचरमुळे कानाकोपऱ्यातील जागा शोधणे सोपे होणार आहे.  म्हणजेच जर समजा गुगल मॅपला सांगितले की ‘अ  बसस्थानकाजवळील हॉटेल’ तर गुगल मॅप सर्वांत आधी त्या ठिकाणाचे लोकेशन दाखवून त्या ठिकाणापासून संबंधित हॉटेलची दिशा दर्शवेल. म्हणजेच गुगल मॅप डिस्क्रिप्टिव्ह स्वरूपात पत्ता दर्शवेल. त्यामुळे कोणतेही ठिकाण शोधण्यासाठी आता तुमची गडबड होणार नाही.

जानेवारी मध्ये होईल रोलआऊट

हे नवीन फिचर ‘Address Descriptor’ या नावाने ओळखले जाणार आहे. नवीन वर्ष्याच्या सुरुवातीला म्हणजेच जानेवारीमध्ये हे फिचर गुगल मॅप रोलआऊट करणार आहे. त्यामुळे प्रवासाची आवड असणाऱ्या तसेच भटकंती करणाऱ्या प्रवाश्यांसाठी हे फिचर अधिक उपयुक्त असेल. तसेच या नवीन सेवेमुळे इतरांना लोकेशन शेअर करणे सोपे होणार आहे. यामध्ये लोकेशन शेअर केलेल्या व्यक्तीला विशिष्ट ठिकाण माहित असावेच असे नाही. त्यासाठी वापरकर्त्याने जवळच्या लँडमार्कचे लोकेशन शेअर केले तरी चालू शकेल. Google Map या नवीन फिचरचा वापर करून व्यक्तीला सेट केलेल्या डेस्टिनेशनवर नेऊन पोहचवेल.

गुगल मॅपचे हे देखील आहेत फिचर

गुगल मॅपचे अनेक असे फिचर आहेत जे अनेकांना माहिती नाहीत. त्यामध्ये गुगलने भारतासाठी दोन नवीन फिचर आणले आहेत. जे  नवीन वर्षात एकूण पंधरा शहरात लागू होणार आहे. ज्यामध्ये Street View Navigation आणि Lens in Map चा समावेश आहे. आता हे फिचर नेमके काम कसे करते ते जाणून घेऊयात. स्ट्रीट व्ह्यू नॅव्हिगेशन हे फीचर हे रस्त्याने चालणाऱ्या यूजरला रस्त्याचे तसेच आजूबाजूच्या इमारतींचे वास्तव चित्र दाखवते. तर लेन्स इन मॅप या फीचरमुळे युजर्सला रस्त्यात दिसणाऱ्या दुकानाची दुसरी शाखा कुठे आहे हे कळते. त्यामुळे यूजरला या नवीन फिचरचा फायदा होणार आहे.