हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या संपूर्ण जगात इलेक्ट्रिक गाडी खरेदी करणाऱ्या ग्राहकांची संख्या वाढत आहे. पेट्रोल डिझेलचा खर्च वाचवण्यासाठी अनेकजण इलेक्ट्रिक गाडी (Electric Vehicle) विकत घेत आहेत. मात्र ग्राहकांसाठी सर्वात मोठी अडचण ठरते ती म्हणजे गाड्या चार्ज करण्याची… कारण लांबच्या पल्ल्याचा प्रवास करत असताना चार्जिंग स्टेशन शोधन आणि त्याठिकाणी चार्ज करणे थोडं कठीण आणि जिकरीचे काम आहे. मात्र आता तुमच्या मोबाईल मधील गुगल मॅप (Google Map) तुमचं हे टेन्शन दूर करणार आहे. लवकरच गुगल मॅप मध्ये नवीन फिचर येणार आहे. या फिचरच्या माध्यमातून तुमच्या जवळचे EV चार्जिंग स्टेशन (EV Charging Station) कुठे आहे ते तुम्हाला समजण्यास मदत होणार आहे.
गुगल मॅपमध्ये येणाऱ्या या फीचरमुळे प्रवाशांचा त्रास कमी होऊ शकतो. तसेच आपण ज्याप्रकारे पेट्रोल पंप शोधतो त्याच प्रकारे गुगल मॅपद्वारे इलेक्ट्रिक गाड्यांचे चार्जिंग स्टेशन शोधन सोप्प होणार आहे. यासाठी गुगल मॅप्स आर्टिफिशियल इंटेलिजेंसची मदत घेणार आहे. ,या फिचरच्या माध्यमातून चार्जिंग स्टेशनचा मार्ग दाखवला जाईल. प्रवाशांना दिशा दाखवण्यासोबतच गुगल मॅप यूजर्स कडून रिव्हिव्ह सुद्धा घेईल. या रिव्हिव्ह मध्ये सदर चार्जिंग स्टेशनची माहिती, तेथील चार्जिंग प्लग, तसेच गाड्यांच्या लागलेल्या रांगा याबाबत माहिती कंपनी यूजर्सकडून घेईल.
गुगल मॅप्स सुरुवातीला इन बिल्ट गाड्यांसाठीच ही नवी सुविधा देणार आहे. जेव्हा तुमच्या गाडीमधील बॅटरी लेव्हल कमी होईल तेव्हा आपोआपच तुम्हाला तुमच्या आसपासच्या इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग स्टेशनची माहिती मिळेल. त्यामुळे प्रवाशांची चिंता नक्कीच दूर होणार आहे. गुगल आपली हि नवी सर्व्हिस सर्वात आधी अमेरिकेत सुरु करणार आहे. त्यानंतर भारतासहित अन्य देशात ही सुविधा आणली जाईल असं बोललं जात आहे. गुगल मॅपच्या या नव्या फीचरमुळे इलेक्ट्रिक गाड्या खरेदी करणाऱ्यांची संख्याही वाढण्याची शक्यता आहे.