Google Map | गाडी चालवत असताना वाहतुकीच्या नियमांचे पालन करणे खूप गरजेचे आहे. वाहतूक पोलिसांकडून नेहमीच लोकांना वाहतुकीच्या नियमांचे पालन करण्याची जाणीव करून दिली जाते. परंतु तरीही अनेक लोके वाहतुकीचे नियम पाळत नाहीत. वाहन चालवताना नेहमीच हेल्मेट खूप गरजेचे असते. परंतु अनेक वेळा लोक हेल्मेट घालत नाही. आणि नंतर अनेक अपघाताला बळी पडतात. पोलिसांकडूनही आजपर्यंत वारंवार यावर कारवाई करण्यात आलेली आहे. तरीदेखील अनेक लोक हेल्मेट घालत नाही. परंतु आता केवळ गुगल मॅपच्या (Google Map) माध्यमातून तुम्हाला पोलीस पुढे असल्याचे सांगण्यात येणार आहे. सध्या सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल होत आहे. त्यावर अनेक लोकांनी प्रतिक्रिया दिलेल्या आहेत. या पोस्टमध्ये गुगल मॅप लोकांना पुढे उभे आहेत. आणि हेल्मेट घाला अशी आज्ञा देताना दिसत आहेत.
गुगल मॅपने (Google Map) चेन्नईच्या काही भागात पोलिस चौक्या खुणावल्या आहेत. चेन्नईतील फिनिक्स मॉलजवळील एका जागेला ‘पोलिस इरुपंगा हेल्मेट पोधुंगो’ असे नाव देण्यात आले आहे. गुगल मॅप येथून जाणाऱ्या रायडर्सना सतर्क करतो आणि त्यांना हेल्मेट घालण्याचे आवाहन करतो. एवढेच नाही तर गुगल मॅपच्या आवाहनावर रायडर्स हेल्मेट घालतात. आता लोक सोशल मीडियावर ही व्हायरल पोस्ट वेगाने शेअर करत आहेत. त्याचबरोबर अनेक यूजर्सनी गुगल मॅपच्या (Google Map) या फीचरचे कौतुकही केले आहे. चालकांना सतर्क केल्याने अपघात कमी होऊ शकतात, असे युजर्सचे म्हणणे आहे.
व्हायरल होत असलेल्या या पोस्टवर लोकांच्या तीव्र प्रतिक्रिया येत आहेत. एका यूजरने लिहिले की, “गुगल मॅपचा हा एक चांगला उपक्रम आहे.” दुसऱ्या युजरने लिहिले की, “यामुळे अपघात कमी होतील आणि लोकांना आधीच सतर्क केले जाईल.” त्याचवेळी आणखी एका युजरने लिहिले की, तंत्रज्ञानाचा योग्य वापर केला जात आहे.