Google Pay And Phone Pay | नवीन ग्राहकांना Google Pay आणि Phone Pay शी जोडता येणार नाही? नक्की काय आहे प्रकरण?

Google Pay And Phone Pay
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन |Google Pay And Phone Pay पंतप्रधान मोदींनी कॅशलेस इंडिया बनवण्याचा निर्णय घेतला. त्यानंत संपूर्ण भारत आता मोठ्या प्रमाणात डिजिटल व्यवहार करत आहे. 85% आर्थिक व्यवहार हे Google Pay आणि Phone Pay यांच्या माध्यमातून होतात. ही एक भारतातील मोठी क्रांती आहे. आता याबाबतच एक मोठी बातमी समोर आलेली आहे. ती म्हणजे आता नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने याबाबत एक मोठा निर्णय घेतलेला आहे. कोणत्याही थर्ड पार्टी पेमेंट UPI व्यवहारांमध्ये 30% पेक्षा जास्त हिस्सा असणार आहे. आणि तो हिस्सा कमी करण्याची व्यवस्था देखील केली जाईल

हा नियम डिसेंबर 2022 मध्ये लागू केला होता. परंतु त्यानंतर गुगल पे आणि वॉलमार्टचा फोन पे (Google Pay And Phone Pay) सारख्या थर्ड पार्टी यांना दोन वर्षाची मुदतवाढ देण्यात आलेली होती. ही मुदत 2024 डिसेंबरपर्यंत संपणार आहे. म्हणजे ज्या पेमेंट ॲप्स डिजिटल व्यवहारांमध्ये 30% आणि जास्त हिस्सा आहे. त्यांना 1 जानेवारी 2025 पासूनपर्यंत ते कमी करण्याची व्यवस्था करावी लागेल.

Google Pay आणि Phone Pay या थर्ड पार्टीचा सध्या डिजिटल व्यवहारांमध्ये 85 टक्के वाटा आहे. पेटीएम हे देखील एक सर्वात लोकप्रिय ॲप आहे तरीही त्यांचा हिस्सा कमी आहे. एनपीसीआय म्हणजेच युनिफाईड पेमेंट इंटरफेस चालवते. जे खरेदीच्या वेळी रियल टाईम डिजिटल पेमेंटसाठी वापरले जाते. त्यामुळे आता ताण कमी करण्यासाठी 30% UPI मार्केट कमाल मर्यादा कशी लागू करायची हे देखील स्पष्ट केले जाणार आहे.

यावर एकमेव उपाय म्हणजे 30 टक्क्यांहून अधिक शेअर असलेल्या ॲप्सना नवीन ग्राहक जोडण्यापासून बंदी घालणे आणि हे काम टप्प्याटप्प्याने केले जाणार आहे. जेणेकरून या युजर्सला देखील कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही. ही मुदत संपायला आणखी काही दिवस बाकी आहेत त्यामुळे येणाऱ्या काळात या निर्णयाबाबत अधिक स्पष्टता दिली जाणार आहे.