भारतात Google Pay फ्री असेल, मात्र अमेरिकेत फंड ट्रान्सफरसाठी आकारले जाईल शुल्क

नवी दिल्ली । गुगलने बुधवारी स्पष्ट केले की, भारतात त्यांच्या डिजिटल पेमेंट प्लॅटफॉर्म गुगल पे (Google Pay) च्या माध्यमातून फंड ट्रांसफरसाठी (Money Transfer) यूजर्सना कोणतेही शुल्क द्यावे लागणार नाही आणि ही फी फक्त अमेरिकेतील यूजर्ससाठीच आहे.

वेब ब्राउझरद्वारे Google Pay सेवा पुढील वर्षी बंद केल्या जातील
गेल्या आठवड्यात गुगलने जाहीर केले की, पुढच्या वर्षी ते अँड्रॉइड आणि आयओएसवर नवीन Google Pay ची ऑफर देईल आणि त्यानंतर यूजर्सना वेब ब्राउझरद्वारे या सेवांचा वापर करता येणार नाही. या अहवालानुसार इन्स्टंट मनी ट्रान्सफरवरही गुगल चार्ज आकारेल.

गुगलच्या प्रवक्त्याने सांगितले की, “ही फी केवळ अमेरिकेसाठी आहे आणि ती भारतात गुगल पे किंवा गुगल पे फॉर बिझिनेस अ‍ॅप्सवर लागू होत नाही.”

गूगल पे आणि युनिफाइड पेमेंट इंटरफेस म्हणजे काय ?
भारतात Google वर डिजिटल पेमेंट अ‍ॅप (Digital Payment App) आहे जे UPI वर आधारित आहे. युनिफाइड पेमेंट इंटरफेस किंवा यूपीआय (Unified Payments Interface) ही एक रिअल टाइम पेमेंट सिस्टम आहे, जी मोबाइल प्लॅटफॉर्मद्वारे त्वरित बँक खात्यात पैसे ट्रांसफर करू शकते. UPI च्या माध्यमातून आपण अनेक UPI अ‍ॅप्सवर बँक खात्याची लिंक जोडू शकता. त्याच वेळी, अनेक बँक खाती UPI अ‍ॅप्सद्वारे ऑपरेट केली जाऊ शकतात.

ऑक्टोबरमध्ये UPI चे 200 कोटी व्यवहार
विशेष म्हणजे कोरोना संकटाच्या वेळी लोकांनी घरी बसून एक नवीन विक्रम नोंदविला आहे. ऑक्टोबर 2020 मध्ये देशभरातील UPI आधारित व्यवहाराच्या बाबतीत देशाने एका महिन्यात 200 कोटींचा आकडा पार केला आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

You might also like