Google Pay ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; आता ऑनलाईन पेमेंटवर सेवा शुल्क आकारले जाणार?

0
1
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । तुम्ही जर गुगल पे वापरात असाल तर हि बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची ठरणार आहे. गुगल पे प्लॅटफॉर्म ग्राहकांना देत असलेल्या सेवेमधून शुल्क आकारणार आल्याची माहिती समोर येत आहे. यामुळे सर्वसामान्यांना भुर्दंड बसणार आहे. कारण आज कोट्यवधी लोक छोट्या व्यवहारापासून ते मोठ्या व्यवहारापर्यंत ऑनलाईन पेमेंटचा वापर करत आहेत . गुगल पे यापूर्वीच्या मोफत सेवांसह विविध प्रकारच्या रिचार्ज आणि बिल पेमेंटसाठी शुल्क घेत नव्हते . पण आता या नियमामध्ये बदल होताना दिसणार आहे. तर हा बदल काय असेल हे सविस्तरपणे जाणून घेऊयात.

सेवा शुल्क आकारण्यास सुरुवात –

सर्व ऑनलाईन पेमेंट प्लॅटफॉर्मनी सेवा शुल्क आकारण्यास सुरुवात केली आहे. आता त्याच्या जोडीला गुगल पे चा देखील समावेश झालेला दिसून येत आहे. त्यामुळे आता ग्राहकांनी गूगल पेद्वारे पेमेंट केल्यास सेवा शुल्क भरावे लागणार आहे. तुम्ही जर बिलचे पेमेंट करण्यासाठी क्रेडिट किंवा डेबिट कार्ड वापरत असाल तर तुम्हाला 0.5 टक्के ते 1 टक्के शुल्क भरावे लागेल. या फी सोबतच जीएसटी देखील द्यावी लागणार आहे.

उदाहरणार्थ, जर आपल्याला 1,000 रुपयांचे बिल भरायचे असेल, तर यावर 0.5% ते 1% आकारले जाणारे शुल्क 5 रुपयांपासून 10 रुपयांपर्यंत असू शकते. यामुळे, ग्राहकांना त्यांच्या पेमेंटची अंतिम रक्कम अधिक असू शकते.

बिलाच्या रकमेवर आकारले जाणारी रक्कम –

प्रक्रिया शुल्क म्हणजे बिलाच्या रकमेवर अतिरिक्त आकारले जाणारे शुल्क. गुगल पे वर, पेमेंट करताना हे शुल्क तुम्हाला बिलाच्या रकमेबरोबर दिले जाणार आहे . जर पेमेंट अयशस्वी झाले, तर तुमची पूर्ण रक्कम आणि प्रक्रिया शुल्क परत मिळते. म्हणजेच ग्राहकांनी गूगल पेद्वारे पेमेंट केल्यास त्यांना सेवा शुल्क भरावे लागेल .पण GPay कडून या प्रकरणावर अजून कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही .