Google Pixel 8 | फ्लिपकार्टवरून निम्म्या किमतीत खरेदी करा Google Pixel 8; जाणून घ्या फीचर्स

Google Pixel 8

Google Pixel 8 | सणासुदीच्या काळात अनेक ई कॉमर्स कंपन्या या त्यांच्या ग्राहकांसाठी नवनवीन ऑफर घेऊन येत असतात. ज्याचा फायदा ग्राहकांना देखील होतो. या ऑफर्स दिल्याने त्यांच्यासोबत अनेक नवीन ग्राहक देखील जोडले जातात. आणि ग्राहकांचा कंपन्यांवर असला असणारा विश्वास देखील वाढीस लागतो. अशातच आता फ्लिपकार्ट ई-कॉमर्स कंपनीने त्यांचा फ्लिपकार्ट बिग बचत सेल सुरू केलेला आहे. या सेलची सुरुवात 7 नोव्हेंबर पासून झालेली आहे. तर 11 नोव्हेंबरपर्यंत हा सेल लाईव्ह असणार आहे.त्यामुळे तुम्हाला अनेक महागड्या गोष्टी कमी किमतीमध्ये विकत घेता येणार आहे.

या फ्लिपकार्टच्या सेलमध्ये तुम्ही महागडे स्मार्टफोन चांगल्या ऑफर सह खरेदी करू शकता. गुगलचा बेस्ट सेलर स्मार्टफोन असणारा Google Pixel 8 हा स्मार्टफोन तुम्हाला निम्म्या किंमतीत खरेदी करता येणार आहे. तर आता या Google Pixel 8 ची किंमत फीचर्स आणि इतर सगळी माहिती आज आपण जाणून घेणार आहोत.

Google Pixel 8 ची किंमत

Google Pixel 8 फोन मध्ये तुम्हाला 108 जीबी स्टोरेज व्हेरियंट मॉडेल मिळेल. Google Pixel 8 ची किंमत 75 हजार 999 रुपये एवढी आहे. फ्लिपकार्टवर हा फोन तुम्हाला अतिशय कमी किमतीमध्ये उपलब्ध होत आहे. Google Pixel 8 हा फोन फ्लिपकार्ट सेलमध्ये तुम्हाला केवळ 42 हजार 999 मध्ये खरेदी करू शकतात. या सेल मध्ये तुम्हाला Google Pixel 8 फोनवर तब्बल 33 हजार रुपयांची सवलत मिळत आहे. त्यामुळे हा फोन जर तुम्हाला खरेदी करायचा असेल तर फ्लिपकार्ट वर तुमच्यासाठी एक खूप चांगली संधी आहे.

Google Pixel 8 चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

Google Pixel 8 फोनची उंची 6.2 इंच एवढी आहे.यामध्ये full Hd + OLED डी डिस्प्ले देण्यात आलेला आहे. त्याचा रिफ्रेश रेट 120 hz एवढा आहे. तसेच स्पीड आणि मल्टी टास्किंगसाठी Google Pixel 8 या फोनमध्ये तुम्हाला प्रोसेसर उपलब्ध आहे. स्टोरेज बद्दल सांगायचे झाले असल्यास या फोनची रॅम 8 जीबी आहे. आणि 128 जीबी आहे. यामध्ये तुम्हाला 256 जीबी स्टोरेजचा पर्याय देखील उपलब्ध आहे. यामध्ये तुम्हाला स्मार्ट इमेज हाय क्वालिटीचे फोटो देखील काढता येतील.

Google Pixel 8 या फोन मध्ये तुम्हाला फोटोग्राफीसाठी ड्युअल रिअल कॅमेरा सेटअप करण्यात आलेला आहे. या सेटमध्ये 50 mp प्रायमरी कॅमेरा दिलेला आहे. तसेच दुसरा कॅमेरा मेगा पिक्सेल आहे. यामध्ये तुम्ही चांगल्या सेल्फी व्हिडिओज तसेच कॉलिंगसाठी 10.5 mp कॅमेरा देण्यात आलेला आहे. या फोनच्या बॅटरी बद्दल सांगायचे झाल्यात गुगल पिक्सेल 8 फोनची बॅटरी 4575mAh ची आहे. Pixel 8 ची बॅटरी 24 तासांपेक्षा जास्त आणि एक्स्ट्रीम बॅटरी सेव्हरसह 72 तासांपर्यंत टिकू शकते. फ्लिपकार्टच्या या सेलमध्ये तुम्हाला Google Pixel 8 या फोनवर खूप चांगली ऑफर मिळत आहे.