8GB RAM, 64MP कॅमेरासह Google Pixel 8a लाँच; पहा किंमत किती?

Google Pixel 8a LAUNCHED
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Google Pixel 8a भारतासह संपूर्ण जगात लाँच करण्यात आला आहे. मोबाईलमध्ये 8GB RAM, 64MP कॅमेरासह अनेक भन्नाट फीचर्स देण्यात आले आहेत. गुगलचा हा स्मार्टफोन एलो, बे, ऑब्सिडियन आणि पोर्सिलेन या ४ रंगात लाँच करण्यात आला असून फ्लिपकार्ट वर 14 मे रोजी सकाळी 6:30 वाजता हा मोबाईल विक्रीसाठी उपलब्ध करण्यात येणार आहे. आज आपण या स्मार्टफोनसह खास फीचर्स आणि किमतीबाबत सविस्तर जाणून घेणार आहोत.

6.1-इंचाचा डिस्प्ले –

Google Pixel 8a मध्ये 120Hz रिफ्रेश रेटसह 6.1-इंचाचा डिस्प्ले देण्यात आला आहे. या डिस्प्लेला कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 3 चे संरक्षण मिळते. कंपनीने मोबाईल मध्ये Tensor G3 प्रोसेसर दिला असून हा मोबाईल Android 14 वर काम करतो. मोबाईल मध्ये 8GB+ 128GB स्टोरेज आणि 8GB+ 256GB स्टोरेज असे २ पर्याय देण्यात आले आहेत. स्टोरेजनुसार त्याच्या किमती वेगवेगळ्या आहेत.

कॅमेरा – Google Pixel 8a

Google Pixel 8a मध्ये पाठी मागील बाजूस 64-मेगापिक्सेलचा प्राथमिक कॅमेरा आणि 13-मेगापिक्सेलचा अल्ट्रावाइड कॅमेरा देण्यात आला आहे तर सेल्फीसाठी 13-मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा उपलब्ध आहे. मोबाईल मध्ये 4,492mAh बॅटरी पॅक बसवला असून हि बॅटरी 18W वायर्ड फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. गुगलच्या या स्मार्टफोन मध्ये ‘सर्कल टू सर्च’, AI इमेज एडिटिंग (मॅजिक एडिटर), ऑडिओ मॅजिक यांसारखे बरेच फीचर्स देण्यात आलेत.

किंमत किती?

मोबाईलच्या किमतीबाबत सांगायचं झाल्यास, 8GB+ 128GB स्टोरेज व्हेरिएन्टची किंमत 52,999 रुपये आणि 8GB+ 256GB व्हेरिएंटची किंमत 59,999 रुपये आहे. 14 मे रोजी सकाळी 6:30 वाजता हा मोबाईल विक्रीसाठी उपलब्ध असेल. हा मोबाईल खरेदी करताना Google च्या निवडक बँक कार्डांवर 4,000 रुपये सूट देखील ग्राहकांना देण्यात येईल.