Wagheshwar Temple : वर्षभरात 8 महिने पाण्याखाली असतं ‘हे’ प्राचीन मंदिर; फक्त 4 महिनेच होत महादेवाचं दर्शन

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Wagheshwar Temple) महाराष्ट्रात अनेक देवी देवतांची प्राचीन मंदिरे आहेत. जिथे भाविकांची कायम गर्दी असते. या मंदिरांपैकी काही मंदिरे अत्यंत पुरातन आणि प्राचीन आहेत. ज्यांच्या आख्यायिका जगभरात प्रसिद्ध आहेत. अशाच एका मंदिराविषयी आज आपण माहिती घेणार आहोत. पुण्यातील वाघेश्वर मंदिर हे ऐतिहासिक संदर्भ आणि स्थापत्याचा एक उत्कृष्ट नमुना आहे. हे मंदिर पावना धरणात आहे. या मंदिराची खासियत अशी की, हे वाघेश्वर मंदिर तब्बल ८ महिने पाण्याखाली असते. तर केवळ ४ महिने दर्शनासाठी उघडे असते. चला तर या अद्भुत अन चमत्कारिक मंदिराविषयी सविस्तर माहिती घेऊया.

८ महिने पाण्याखाली असणारे वाघेश्वर मंदिर (Wagheshwar Temple)

पुण्यातील मावळा येथील वाघेश्वर मंदिर अत्यंत प्राचीन असे महादेवाचे मंदिर आहे. हे मंदिर पावना धरणात स्थित असल्याने पावसाळा आणि नंतरचे चार असे ८ महिने हे मंदिर पाण्याखाली असते. तर फक्त ४ महिनेच भाविकांना या मंदिरात दर्शन घेता येते. पुण्यातील पावना धरण हे १९६५ साली बांधण्यात आले होते. मात्र त्याचा वापर १९७१ सालापासून सुरु झाला. या धरणात जसजसा पाणीसाठा वाढतो तसतसे हे ऐतिहासिक मंदिर पाण्याखाली जाते. त्यामुळे केवळ उन्हाळ्यात जेव्हा पाण्याची पातळी कमी होते फक्त तेव्हाचे ४ महिनेच हे मंदिर पाण्याबाहेर असते. हे मंदिर पाहण्यासाठी राज्यातील कानाकोपऱ्यातून भाविक मोठ्या श्रद्धेने येत असतात.

७०० ते ८०० वर्ष जुने बांधकाम

काही संधोशनकर्त्यांच्या अभ्यासानुसार, वाघेश्वर मंदिराचे बांधकाम ११ किंवा १२व्या शतकात झाले असावे. त्यामुळे समजते की, हे मंदिर जवळपास ७०० ते ८०० वर्ष जुनं मंदिर आहे. (Wagheshwar Temple) हेमाडपंथी शैलीत असलेल्या या मंदिराच्या बांधकामासाठी वापरण्यात आलेले दगड हे एकमेकांना जोडून लावण्यात आल्याचे दिसते. तर मंदिरातील दगडांवर कोरलेले शिलालेख हे मंदिर किती प्राचीन असेल याची साक्ष देतात.

हे संपूर्ण मंदिर दगडांनी बनवलेलं आहे. मात्र, आता या मंदिराचा फक्त ढाचाच शिल्लक आहे. (Wagheshwar Temple) हे मंदिर अत्यंत पुरातन असल्याने अनेक ठिकाणी त्याची पडझड झाली आहे. तर, आजूबाजूच्या भिंतीचे काही अवशेष शिल्लक राहिले आहेत. या मंदिराचा कळस ढासळला आहे. मात्र, गाभारा सुस्थितीत आहे. या मंदिराच्या चारही बाजूने भिंतींना भेगा पडल्या असून काही अवशेष बाकी आहेत.

छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे संबंध

पुण्यातील वाघेश्वर मंदिराचा आणि छत्रपती शिवाजी महाराजांचाही थेट संबंध असल्याचे काही इतिहास जाणकार सांगतात. असे सांगितले जाते की, कोकण आणि सिंधुदुर्गची मोहिम फत्ते केल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज हे वाघेश्वर मंदिरात महादेवाच्या दर्शनासाठी आले होते. (Wagheshwar Temple) तसेच, छत्रपती शिवाजी महाराज तिकोणा व कठीणगड (तुंग) किल्यावर आले की, आवर्जुन या ठिकाणी दर्शनाला येत असत.