Google Play Store ने स्कॅनर -2 सहित हे 6 अॅप्स काढून टाकले, लोकांनाही डिलीट करण्याचा दिला सल्ला

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गूगलने आपल्या प्ले स्टोअरमधून असे सहा मोबाइल अॅप्स काढून टाकलेले आहेत ज्यात Convenient Scanner 2 आणि Safety Applock यांचा समावेश आहे, ज्यात मालवेयर (Malware) लपलेले होते. हटविलेल्या या अॅप्समध्ये Push Message-Texting and SMS, Emoji Wallpaper, Separate Doc Scanner आणि Fingertip GameBox चा समावेश आहे. या धोकादायक अॅप्सना सायबर सिक्यॉरिटी रिसर्चर्सने शोधून काढले आहे. या अॅप्समध्ये जोकर मालवेयर होता. ही सर्व अॅप्स त्वरित हटवण्याचा सल्ला युझर्सना देण्यात आला आहे.

गेल्या तीन वर्षात Google Play Store ने 1,700 हून अधिक अॅप्स काढले आहे
सायबर सिक्युरिटी फर्म प्रिडिओच्या म्हणण्यानुसार, ज्या स्मार्टफोनमध्ये हा मालवेअर होता तो बिना युझर्सने प्रीमियम सर्व्हिस सब्‍सक्राइब होत असे. गेल्या तीन वर्षांत गुगलने जोकर मालवेअरचे 1,700 अॅप्स प्ले स्टोअरमधून काढले आहेत. हे 6 धोकादायक अॅप्स आतापर्यंत 2 लाखाहून अधिक वेळा डाउनलोड केले गेले आहेत. युझर्सच्या डेटा सुरक्षेच्या दृष्टीने या अॅप्सना धोकादायक प्रकारात स्थान देण्यात आले आहे. युझर्सना हे अॅप्स न वापरण्याचा सल्ला देण्यात आला आहे. या अॅप्सवर मलीशश कंटेंट आढळला आहे.

युझर्सच्या मंजूरीशिवाय प्रीमियम सर्व्हिस अॅक्टिव्ह करते
गुगलने आता हे सर्व अॅप्स प्लेस्टोअर वरून काढले आहेत, मात्र ते तुमच्या मोबाइलमध्ये असतील तर ते धोकादायक सिद्ध होऊ शकतात. मागील वर्षीदेखील 100 हून अधिक अॅप्समध्ये मालवेअर आढळले होते. मालवेअर असलेले ए अॅप्स शोधणे सोपे नाही. गुगल प्ले स्टोअरमध्ये सायबर सिक्युरिटी फर्मच्या संशोधकाने जोकर ड्रॉपर आणि प्रीमियम डायलर स्पायवेअरचे नवीन सॉफ्टवेअर पकडले होते, जे तुमच्या स्मार्टफोनमध्ये बरीच गडबड करू शकते. युझर्सची मंजूरी न घेता बरीच प्रीमियम सर्व्हिस अॅक्टिव्ह करतात.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

Leave a Comment