Google लवकरच लाँच करणार Pixel 7 आणि Pixel 7 Pro स्मार्टफोन

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । स्मार्टफोनच्या जगात आपले वेगळेपण जपण्याचा प्रयत्न प्रत्येक स्मार्टफोन कंपनी करत असते. अशातच Google आता आपल्या Pixels ची सीरीजमधील Pixel 7 आणि Pixel 7 Pro लॉन्च करणार आहे. Google नेक्स्ट जनरेशन Pixel 7 सीरीजचा फ्लॅगशिप स्मार्टफोन देखील लॉन्च करणार आहे. मात्र Google कडून सध्या या फोन्सबाबत अधिकृतपणे कोणतीही माहिती शेअर केली गेली नाही.

Pixel 7 आणि Pixel 7 Pro हे गेल्या वर्षी आलेल्या Pixel 6 आणि Pixel 6 Pro सारखेच असतील असे म्हंटले जात आहे. हे फोन Pixel 6 ची पुढची आवृत्ती असतील. या फोनचे कॅमेरे Pixel 6 सारखेच असतील. मात्र Google Pixel 7 स्मार्टफोनमध्ये ड्युअल कॅमेरा सेटअप असेल. यात 50-मेगापिक्सेलचा प्रायमरी कॅमेरा आणि 12MP अल्ट्रा-वाइड कॅमेरा सेन्सर मिळेल.

Google Pixel 6 Pro Specs, Review and Price | DroidAfrica

तर Pixel 7 Pro स्मार्टफोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप असेल. त्याचा प्रायमरी कॅमेरा 50MP असेल, 12MP अल्ट्रा-वाइड अँगल सेन्सर आणि 48MP टेलीफोटो लेन्स देखील दिले जाईल. सेल्फीसाठी फोनमध्ये पंच-होल कटआउट देखील दिला जाऊ शकेल. Google

Google Pixel 6 Pro

गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये भारतात Google Pixel 6 Pro स्मार्टफोन लॉन्च केला गेला होता. या फोनमध्ये ट्रिपल बॅक कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यामध्ये प्रायमरी कॅमेरा 50 MP चा आहे. यासोबतच 12 MP आणि 48 MP चे दोन सेन्सरही देण्यात आले आहेत. याबरोबरच 1440 x 3120 पिक्सेलचा 6.7-इंचाचा डिस्प्ले असेल.

सोशल मीडियावर लीक झालेल्या एका रिपोर्टमध्ये असे सांगण्यात आले आहे की, ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या इव्हेंटमध्ये Google Pixel 7 सीरीजचे फोन लॉन्च केले जातील. इव्हेंटमध्ये फोनसोबत गुगल पिक्सेल वॉचही लॉन्च केला जाईल. या फोनमध्ये जीपीएस, ब्लूटूथ, वाय-फाय आणि ओटीजी सारखे फीचर्स देखील आहेत.

Google Pixel 7 Specifications and price - Phone Techx

Google टेन्सर प्रोसेसर

Pixel 7 ला नॉन-LTPO डिस्प्ले मिळेल तर 7 Pro मध्ये LTPO पॅनल असेल. Pixel 7 फोनमध्ये 6.3-इंचाचा डिस्प्ले असेल. डिस्प्लेचा रिफ्रेश रेट 90Hz असेल. Pixel 7 Pro मध्ये 6.7-इंचाचा डिस्प्ले दिला जाऊ शकेल. त्याचा रिफ्रेश रेट 120Hz असेल. फोन गुगल टेन्सर प्रोसेसरने सुसज्ज असतील.

Pixel 7 सीरीज फोनच्या उजव्या बाजूला पॉवर बटण आणि व्हॉल्यूम रॉकर-की देण्यात आली आहे. तळाशी, स्पीकर आणि USB टाइप-सी पोर्टसाठी कटआउट आहे. या सिरीज मधील फोन Stormy Black, Kinda Coral, Sorta Seafoam आणि Cloudy White शेड्समध्ये येऊ शकतील.

हे पण वाचा :

BSNL Recharge Plans: 1498 रुपयांत मिळवा 365 दिवसांसाठी डेली 2GB डेटा

Airtel च्या ‘या’ प्रीपेड प्लॅनमध्ये मिळत आहे Amazon Prime चे Free सब्सक्रिप्शन

Internet : 365 दिवसांसाठी 100Mbps चा वेगवान इंटरनेट स्पीड देणारे ‘हे’ 5 स्वस्त ब्रॉडबँड प्लॅन पहा

BSNL चा धमाकेदार प्लॅन : Jio अन Airtel पेक्षाही स्वस्त; 19 रुपयात महिनाभर घेता येणार अनेक फायदे

Airtel चा नवा प्लॅन : Netflix वर मोफत पहायला मिळणार मनसोक्तपणे Movies – Web Series

Leave a Comment