मोदींच्या मतदारसंघात गुगलचे CEO सुंदर पिचई यांच्याविरोधात FIR दाखल; ‘हे’ आहे कारण

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

वाराणसी । पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाराणसी मतदारसंघात एक कमालीची घटना समोर आली आहे. वाराणसीमधील भेलूपूर पोलीस ठाण्यात थेट गुगलचे CEO सुंदर पिचई यांच्याविरोधात दाखल एफआयआर दाखल करण्यात आली आहे. सुंदर पिचई यांच्याविरोधात आयटी अ‍ॅक्ट आणि कटकारस्थान रचल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुंदर पिचई यांच्यासह या एफआयआरमध्ये एकूण १८ जणांविरोधात आयटी अ‍ॅक्ट अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही एफआयआर न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतर ६ फेब्रुवारी रोजी नोंदवण्यात आली आहे. वाराणसीमधील गौरीगंज परिसरात राहणाऱ्या गिरिजा शंकर यांनी ही एफआयआर नोंदवली आहे.

नेमकं प्रकरण आहे तरी काय?
वाराणसीमध्ये राहणाऱ्या गिरिजा शंकर यांनी केलेल्या आरोपानुसार, व्हॉट्स अ‍ॅपच्या एका ग्रुपवर आलेल्या व्हिडिओच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात आक्षेपार्ह टीका करण्यात आली होती. त्यानंतर गिरिजा शंकर यांनी त्या क्रमांकावर फोन करून व्हिडीओवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. त्यानंतर यूट्युबवर एक व्हिडीओ अपलोड केला गेला. ज्यामध्ये कथितपणे गिरिजा शंकर यांचा मोबाईल क्रमांक शेअर करण्यात आला. तेव्हापासून गिरीजा शंकर यांना धमक्या देणारे फोन येत आहेत.

गिरीजा शंकर यांचा मोबाइल क्रमांक यूट्युबवर अपलोड करणाऱ्या व्यक्तीचे नाव विशाल सिंह आहे. त्याने यूट्युबवर एक व्हिडिओ तयार केला आणि गिरिजा शंकर यांचा मोबाइल क्रमांक त्या व्हिडीओमध्ये टाकून या व्यक्तीपासून आपल्याला धोका असल्याचे एक गाणे तयार केले. तेव्हापासून गिरिजा शंकर यांना सुमारे ८ हजार ५०० धमकीचे फोन आले आहेत. यामधून जीवे मारण्याची धमकी आणि शिविगाळ केली जात आहे.

त्यानंतर गिरिजा शंकर यांनी या प्रकरणी न्यायालयात कलम १५६ अंतर्गत विनंती केली. त्यानंतर न्यायालयाने भेलूपूर पोलीस ठाण्यात रिपोर्ट दाखल करून तपासाचे आदेश दिले. त्यानंतर गिरिजा शंकर यांनी भेलूपूर पोलीस ठाण्यात १८ जणांविरोधात गुन्हा दाखल केला. या १८ जणांमध्ये गुगलचे सीईओ सुंदर पिचई यांच्यासह गुगलच्या अन्य दोन अधिकाऱ्यांचा समावेश आहे. त्यांच्यावर आयटी अ‍ॅक्ट आणि कारस्थान रचल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. आता पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’.

Leave a Comment