सरकारला दारू विक्रेत्यांकडून मिळणाऱ्या मेव्याचा हेवा; पडळकरांची घणाघाती टीका

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | चंद्रपूर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर सुरू असलेली अवैध दारूविक्री आणि गुन्हेगारीतील वाढ रोखण्यासाठी ठाकरे सरकारने चंद्रपूर मधील दारूबंदी उठवण्याचा निर्णय घेतल्यानंतर विरोधी पक्ष भाजप आक्रमक झाला असून आमदार गोपीचंद पडळकर यांनी पुन्हा एकदा सरकारवर निशाणा साधला आहे. वसुली सरकारला काँग्रेस मंत्र्यांसाठी बहुजनांच्या हितापेक्षा दारू विक्रेत्यांकडून मिळणाऱ्या ‘मेव्या’चा ‘हेवा’ आहे. सरकारला हा मेवा जास्त महत्वाचा वाटतो,” अशी घणाघाती टीका भाजप नेते आणि आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली.

मी यांना जाहीरपणे विचारतो. मेवा मिळत नसेल म्हणून तुम्ही बहुजनांचे हक्क मंत्रिमंडळात मांडत नसाल, तर मी माझ्या बहुजन बांधवांकडून आपल्यासाठी लोकवर्गणीने मेवा जमा करण्याचं आवाहन करू शकतो,” असंही पडळकर म्हणाले.

तसेच पुढे बोलताना पडळकर यांनी राज्य सरकार बहुजनांच्या हक्कासाठी लढत नसल्याचा आरोप केला. “वसुली करण्यासाठी राज्य सरकारने बहुजनांचे हक्क गहाण ठेवले आहेत. बहुजनांचे हक्क गहाण ठेवणाऱ्या या सरकारचा मी धिक्कार करतो,” असे खडे बोल पडळकर यांनी सुनावले.

ब्रेकिंग बातम्या सर्वांत अगोदर मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 9028429273 हा नंबर तुमच्याकडील WhatsApp ग्रुपला Add करा.

Leave a Comment