पडळकरांचे वडेट्टीवारांना उद्धव ठाकरे स्टाईल पत्र; तब्बल 6 वेळा केला ‘किंबहुना’ शब्दाचा प्रयोग

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | ओबीसी आरक्षणाचा मुद्दा राज्यात चांगलाच तापला आहे. याच पार्श्वभूमीवर भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी मंत्री विजय वडेट्टीवार यांना पत्र लिहून संताप व्यक्त केला आहे. वडेट्टीवार यांनी पडळकराना लहान बालक म्हंटल होत त्याचाही त्यांनी पत्रात समाचार घेतला. दरम्यान या पत्रात पडळकरांनी जाणूनबुजून तब्बल 6 वेळा किंबहुना हा शब्द वापरत मुखमंत्र्यांच्या स्टाईलमध्ये वडेट्टीवारांवर निशाणा साधला आहे.

काय आहे पडळकरांचे पत्र-

मुख्यमंत्र्यांना हरवलेली मंत्रीमंडळ उपसमिती शोधण्यासाठी टास्कफोर्सचं गठन करण्याची मागणी केल्यानंतर ‘निष्क्रीय दिग्गजांच्या मंत्रीमंडळ उपसमितीमधून एका तरी मंत्र्याला जाग आली बरं आहे. मला गवताची उपमा देण्याआधी आपण कधी पावसाळ्यात उगवलेल्या छत्रीशी ‘स्वआकलन’ केले आहे का? असो आपण आपली भाषा प्रस्थापितांच्या विरोधात वापरली असती तर ओबीसी समाजाच्या हिताचे कल्याण झाले असते.” अस पडळकर म्हणाले.

किंबहूना, आपण म्हणता ते खरं आहे, कारण मला ओबीसी हिताकरिता स्थापन झालेल्या ‘महाज्योतीचे’ अध्यक्षपद फक्त मिरवण्याकरिता धारण करता आले नसते. किंबहूना मला आपल्यासारखे दहावी पास असतानासुद्धा उच्चशिक्षणासाठी विदेशात जाण्याकरिता खोट्या कागदपत्रांच्या आधारे पासपोर्ट प्राप्त करता आले नसते.”, असा टोला पडळकर यांनी विजय वडेट्टीवार यांना लगावला आहे.

किंबहूना आपल्या मतदारसंघातील शेतकऱ्यांसाठी अत्यावश्यक असलेल्या गोसखुर्द प्रकल्पात कंत्राटदारासोबत टक्केवारीने अंड्स्टॅडींग न झाल्याने त्यांच्याविरूद्ध तक्रारींचा पाऊस पाडता आला नसता. किंबहूना आपल्यासारख्या दूरदृष्टीने स्वकीयांसाठी छत्तीसगडमध्ये आधी दारूची फॅक्टरी विकत घेऊन मगच कायदा व सुव्यवस्थेचे कारण देत चंद्रपूरमधूल दारूबंदी उठवता आली नसती.

किंबहूना दारूबंदीनंतर २३ लिकर शॅाप्सला भागीदारीने चंद्रपूरला स्थलांतरीत करता आले नसते. किंबहूना नागपूरला डिलरशीप घेऊन चंद्रपूरमधील विक्रेत्यांना फक्त तेथूनच दारू विकत घेण्याची अट घालता आली नसती. किंबहूना म्हणूनच मी आपल्या या अफाट कर्तृत्वापुढे आपल्या दृष्टीने अज्ञानी बालक असेल.

मला गवताची उपमा देण्याआधी आपण कधी पावसाळ्यात उगवलेल्या छत्रीशी  ‘स्वआकलन’ केले आहे का?  असो आपण आपली भाषा प्रस्थापितांच्या विरोधात वापरली असती तर ओबीसी समाजाच्या हिताचे कल्याण झाले असते, असं प्रत्त्युत्तर पडळकरांनी वडेट्टीवारांना दिलं आहे.

Leave a Comment