“लक्षात ठेवा अन्यथा गाठ माझ्याशी अन् धनगरांशी आहे”; गोपीचंद पडळकरांचा महाविकास आघाडीवर निशाणा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात आगामी महापालिका निवडणुकीमुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. अशात मराठा आरक्षण व धनगर समाजाच्या विविध मागण्यांवरुन भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांनापत्र लिहिले आहे. “फडणवीस सरकारनं धनगर समाजासाठी 22 कल्याणकारी योजना व 1000 कोटी निधी दिला. प्रस्थापितांच्या सरकारनं या योजना गुंडाळल्यात. काही घराण्यांची इच्छा आहे की माझ्या धनगर समाजाचा वापर सतरंज्या उचलण्यासाठी व्हावा, लक्षात ठेवा गाठ आमच्याशी आहे, असा पडळकरांनी पत्रातून महाविकास आघाडीवर निशाणा साधला आहे.

गोपीचंद पडळकर यांनी आज ट्विट करीत धनगर आरक्षणाच्या मुद्यांवरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. त्यांनी ट्विटमध्ये म्हंटले आहे की, “आरक्षण मिळत नाही तोपर्यंत कोंडी फोडण्याची ताकद फडणवीस सरकारनं धनगर समाजासाठी दिलेल्या “जे आदिवासांनी ते धनगरांना” या धोरणांतर्गत महाराजा यशवंतराव होळकर महामेष योजनेसह 22 कल्याणकारी योजनेत होती. स्वातंत्र्याच्या 70 वर्षात प्रस्थापितांनी धनगर समाजाची कोंडी केली होती.

जोपर्यंत धनगर समाजाला ‘एसटी’चा दाखला मिळत नाही. मुघल, इंग्रज हर एक गनिमांना अंगावर घेऊन स्वातंत्र्याचा ध्वज उंचवणारा माझा समाज. माझ्या समाजाचा वापर आज प्रस्थापितांच्या सतरंज्या उचलण्यासाठी व्हावा, अशी काही मोजक्या घराण्यांची इच्छा आहे. लॉकडाऊन, अतिवृष्टी, गावागावत हल्ले, आघाडीचं सरकार आलं की विस्थापितांना टाचेखाली चिरडण्याचा राक्षसी आनंद प्रस्थापितांना घ्यायचा असतो असे पडळकरांनी सांगितले.

Leave a Comment