गोपीचंद पडळकरांच्या भावाच्या गाडीला भीषण अपघात

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाविकास आघाडी व राष्ट्रवादी काँग्रेसवर वारंवार टीकास्त्र सोडण्याचे काम भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्याकडून केले जातंय. काही दिवसापूर्वी त्याच्यावरही हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. आता त्यांच्यानंतर त्यांचे बंधू आणि सांगली जिल्हा परिषदेचे सदस्य ब्रम्हानंद पडळकर यांच्या गाडीला भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. या अपघात ब्रम्हानंद पडळकर यांच्यासह तिघे जखमी झाले असून त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांचे मोठे बंधू ब्रम्हानंद पडळकर यांच्या गाडीला सांगली जिल्ह्यातील विटा-कुंडल रोडवर अपघात झाला आहे. कार्यकर्त्यांच्या मुलीच्या साखरपुड्यासाठी जात असताना मालवाहू टेम्पो आणि पडळकर यांच्या गाडीचा समोरासमोर धडक झाली.

टेम्पो आणि पडळकर यांच्या गाडीचा झालेला अपघात इतका भीषण होता की, यात ब्रम्हानंद पडळकर यांच्या गाडीच्या समोरील भागाचा चक्काचूर झाला असून पिकअप गाडीचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या अपघातात ब्रम्हानंद पडळकर गंभीर जखमी झाले आहे. या अपघातात ब्रह्मानंद पडळकर ड्रायव्हर सह तिघेजण गंभीर जखमी झाले आहे. गोपीचंद पडळकर आपला साताऱ्याचा दौरा सोडून विट्याकडे रवाना झाले आहे.

Leave a Comment