Wednesday, October 5, 2022

Buy now

गोपीचंद पडळकरांच्या गाड्यांचा ताफा पोलिसांनी अडवला; सदाभाऊ, पडळकर आक्रमक

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आज अहिल्याबाई होळकर यांची जयंती असून चौंडी येथे अहिल्याबाई होळकर यांचा जयंती उत्सव कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या ठिकाणी नुकतेच राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार शरद पवारही दाखल झाले आहेत. दरम्यान या ठिकाणी भाजप आमदार गोपीचंद पडळकर व शेतकरी संघटनेचे नेते सदाभाऊ खोत हे निघाले असताना पोलिसांनी मध्येच त्यांच्या गाड्यांचा ताफा अडवला. यावेळी आक्रमक झालेल्या सदाभाऊ खोत व पोलिसांच्यात बाचाबाचीही झाली. तर  खोत व पडळकर यांच्या समर्थकांनी आणि कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत निषेध नोंदवला.

आज सकाळी श्री क्षेत्र जेजुरी गडावर मल्हारी मार्तंड खंडेराय या देवाचे गोपीचंद पडळकर व सदाभाऊ खोत यांनी कार्यकर्त्यांसह दर्शन घेतले. त्यानंतर दोघेही चौंडी या ठिकाणी अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त त्या ठिकाणी जाण्यासाठी निघाले असता पोलिसांनी त्याच्या गाड्यांचा ताफा अडवला.

यावेळी आक्रमक झालेल्या सदाभाऊ खोत व गोपीचंद पडळकर व पोलिसाच्यात काहीकाळ बाचाबाचीही झाली. यावेळी पोलिसांनी दोघांनाही कार्यकर्त्यास चौंडी येथे जाण्यास विरोध केला आहे. पोलिसांच्या विरोधानंतर आक्रमक झालेल्या पडळकर यांनी कोणत्याही परिस्थितीत आपण चौंडी येथे अहिल्यादेवींच्या जयंतीला जाणार असल्याचे म्हंटले आहे.