हातात टाळ घेत पंकजाताई भजनात तल्लीन; व्हिडिओ व्हायरल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

बीड । भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या जयंती निमित्ताने आज भाजप नेत्या पंकजा मुंडे आणि खासदार प्रीतम मुंडे कुटुंबासह परळी येथील गोपीनाथ गडावर दाखल झाल्या. त्यांनी वडील गोपीनाथ मुंडे यांना अभिवादन केलं. कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर गोपीनाथ गडावर यावर्षी सभा रद्द करण्याचा निर्णय पंकजा मुंडे यांनी घेतला.

मात्र, गोपीनाथ मुंडे यांच्या जयंती निमिताने गोपीनाथ गडावर आज भजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात पंकजा मुंडे सहभागी झाल्या. हातात टाळ घेऊन पंकजा यादेखील भजनात तल्लीन झालेल्या पाहायला मिळाल्या. भजनात टाळ वाजवताचा त्यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

https://www.facebook.com/watch/?v=855022715334642

याशिवाय सध्याच्या कोरोना संकट काळात अनेक रुग्णांना रक्ताची गरज भासत आहे. राज्यात रक्ताचा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे गोपीनाथ गडावर आज रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलं. विशेष म्हणजे पंकजा मुंडे यांनी रक्तदान करुन शिबिराचा शुभारंभ केला. (Gopinath Munde Birth Anniversary program)

https://www.facebook.com/watch/?v=916296338905657

 

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Leave a Comment