हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | सध्याच्या काळात प्रत्येकाकडे मोबाईल फोन असतोच आणि मोबाईल फोन ही गरजेची बाब बनलेली आहे. मोबाईल फोनमुळे आपली बरीचसी कामे सोपी होत गेली आहेत. अनेकांना मोबाईल चॅटिंगसाठी किंवा ऑनलाईन खरेदीसाठी तसेच सोशल मीडिया वापराण्यासाठी वापरतात. पण तुम्हाला माहित आहे का? मोबाईल वर तुम्ही कोणत्याही सरकारी योजनांना अर्ज करून घरबसल्या लाभ सुद्धा घेऊ शकता. तसेच आधार कार्ड, पण कार्ड, पासपोर्ट यांसारख्या गरजेच्या गोष्टी सुद्धा तुम्ही मोबाईलच्या माध्यमातून जाणून घेऊ शकता. यासाठी काही सरकारी अँप्स (Government Apps) आहेत जी तुम्हाला तुमच्या मोबाईल मध्ये डाउनलोड करून ठेवावी लागतील. चला जाणून घेऊयात नेमकी कोणकोणती ही अँप्स आहेत.
1) mPrivahan :
प्रत्येक वाहन वापरकार्त्याने हे अँप आपल्या फोन मध्ये असणे आवश्यक आहे. हे ऍप तुमच्या मोबाईल मध्ये डाउनलोड करून ठेवा. कारण याच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या वाहनाशी सबंधित कागदपत्रे डाउनलोड करू शकता. तसेच याच्या मदतीने ड्रायव्हिंग लायसेन्स आणि गाडी रजिस्ट्रेशन सर्टिफिकेटची डिजिटल कॉपी तयार केली जाऊ शकते. महत्त्वाची गोष्ट म्हणजे यावर उपलब्ध डिजिटल कॉपीला कायदेशीर मान्यता देखील आहे. त्यामुळे या ऍपचा तुम्हाला फायदा होईल.
2) umang :
Umang चे पूर्ण रूप म्हणजे युनिफाइड मोबाईल ऍप्लिकेशन फॉर न्यू-एज गव्हर्नन्स होय. नॅशनल ई-गव्हर्नन्स डिव्हिजन, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय (MeitY) यांच्याद्वारे एक उपक्रम म्हणून उमंग हे ऍप तयार करण्यात आले आहे. उमंग ऍप मध्ये तुम्हाला सरकारच्या महत्वाच्या योजनाची माहिती मिळते. सरकारने जारी केलेल्या नवीन योजनांची माहिती मिळते. तसेच हे ऍप मोबाईल तसेच वीज बिल पेमेंट, पॅन कार्ड, आधार कार्ड नोंदणी, माहिती शोध आणि अर्ज फॉर्मसह शेकडो सेवा प्रदान करते. या ऍपचा सर्वसाधारण उद्देश हा आहे की, सर्वसामान्य लोकांना सरकारी सेवा चोवीस तास ऑनलाईन सेवा पुरवणे हा आहे. त्यामुळे हे ऍप तुमच्या मोबाईल मध्ये असेल तर तुम्हाला त्याचा चांगला फायदा होऊ शकतो.
3) M Aadhaar :
या सरकारी ऍपमुळे तुम्हाला तुमच्या आधार कार्डशी संबंधित असलेल्या सर्व गोष्टीची माहिती मिळते. तसेच या ऍपच्या माध्यमातून तुम्हाला आधार कार्ड देखील काढता येते. M Aadhaar वर जावून तुम्ही तुमचे आधार कार्ड अपडेट करू शकता. त्यामुळे हे ऍप तुमच्या मोबाईलमध्ये असणे आवश्यक आहे.
4) DigiLocker :
डिजीलॉकर हा डिजिटल इंडिया अंतर्गत निर्माण केलेला एक सरकारी उपक्रम आहे. याद्वारे तुम्ही दस्तऐवज सुरक्षित ठेऊ शकतात. भारत सरकारच्या या ऍपचा उद्देश भारताला डिजिटली सशक्त समाज आणि ज्ञान अर्थव्यवस्थेत बदलणे आहे. तसेच यांमध्ये स्टोअर केलेले कागदपत्रे हे बँकांसाठी खाते उघडणे आणि केवायसी (नो युवर कस्टमर) प्रक्रिया सुलभ करू शकते. त्यामुळे हे ऍप तुमच्या फायद्याचे आहे.
5) mPassport Seva:
mPassport Seva हे ऍप वापरण्यास सोपे आहे. ज्याद्वारे पासपोर्ट सेवा पोर्टलवर उपलब्ध असलेली सर्व कार्ये प्रदान केली जातात. जसे की नवीन वापरकर्ता नोंदणी, विद्यमान वापरकर्ता लॉगिन, पासपोर्ट सेवांसाठी अर्ज करणे, ऑनलाइन पैसे देणे, भेटीचे वेळापत्रक, पासपोर्ट केंद्रांचे स्थान जाणून घेणे, फी तपशील, अर्जाची स्थिती यासारख्या विविध सेवा या ऍप द्वारे प्रदान केली जातात. त्यामुळे हे पाच ऍप तुमच्या मोबाईलमध्ये असतील तर तुम्हाला सरकारशी संबंधित सर्व योजना व माहिती मिळू शकते.