हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | केंद्र सरकारने देशातील नागरिकांसाठी अनेक योजना आणलेल्या आहेत. त्यातीलच एक महत्त्वाची योजना म्हणजे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना. ही योजना खास शेतकऱ्यांसाठी तयार करण्यात आलेली आहे या योजनेअंतर्गत दरवर्षाला सहा हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होतात. आता ज्या शेतकऱ्यांनी या योजनेअंतर्गत नवीन नोंदणी केलेली आहे. त्याच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे.
पीएम किसान योजनेची ज्या शेतकऱ्यांनी नोंदणी पूर्ण केलेली आहे. त्यांच्यासाठी सरकारने लाभार्थी यादी उपलब्ध करून दिलेली आहे. आता या यादीत तुमचे नाव आहे की नाही हे तुम्हाला चेक करावे लागेल. जर या अधिक तुमचे नाव असेल तर तुम्ही या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र आहात. पीएम किसान लाभार्थी यादी सरकारने पीएम किसानच्या अधिकृत पोर्टलवर जाहीर केलेली आहे. तुम्ही मोबाईलद्वारे किंवा कम्प्युटरद्वारे ही यादी तपासू शकता.
यादीत नाव कसे चेक करावे?
पीएम किसान सन्मान निधीच्या यादीत तुमचे नाव चेक करायचे असेल, तर तुम्हाला सगळ्यात आधी पीएम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागेल. ते पोर्टल ओपन झाल्यावर तुम्हाला मेन पेजवर जावे लागेल. तिथे तुम्हाला लाभार्थीचा पर्याय दिसेल. आता या पर्यायावर क्लिक करा आणि एक नवीन पेज उघडेल. त्या पेजमध्ये तुमचे राज्य निवडा. तसेच इतर आवश्यक माहिती निवडा. आणि रिपोर्ट ऑप्शन दिसेल त्यावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला पीएम किसानची लाभार्थी यादी दिसेल. ही यादी तुम्ही डाऊनलोड करू शकता.
पीएम किसान योजनेची नोंदणी पूर्ण करण्यासाठी तुम्हाला काही आवश्यक कागदपत्रांची गरज देखील लागेल.यासाठी तुम्हाला तुमचे आधार कार्ड, पासबुक, उत्पन्न प्रमाणपत्र, पत्त्याचा पुरावाबाबत ओळखपत्र आणि जमिनी संबंधित काही कागदपत्रे जमा करावी लागते.