Friday, June 2, 2023

PM आवास योजनेंतर्गत सरकारने 1 लाखांहून जास्त घरांना दिली मंजूरी, अशा प्रकारे करा अर्ज

नवी दिल्ली । जर तुम्हालाही स्वतःचे घर घ्यायचे असेल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. वास्तविक, केंद्र सरकारने प्रधानमंत्री आवास योजना- अर्बन मिशन अंतर्गत 1 लाखांहून जास्त घरे बांधण्यास मंजुरी दिली आहे. आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, पुद्दुचेरी आणि उत्तराखंड या देशातील 5 राज्यांमध्ये ही घरे बांधली जातील.

गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालय (MoHUA) सचिव दुर्गा शंकर मिश्रा यांनी राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये पायाभूत सुविधा आणि घरांच्या बांधकामाशी संबंधित मुद्द्यांवर चर्चा केली. या दरम्यान 1.07 लाख घरांच्या बांधकामाला मंजुरी देण्यात आली आहे.

1.14 कोटी घरांच्या बांधकामाला मंजुरी
मंत्रालयाने सांगितले की,” प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) मिशन अंतर्गत एकूण 1.14 कोटी घरे बांधकामासाठी मंजूर करण्यात आली होती, त्यापैकी 53 लाख घरे पूर्ण झाली आहेत आणि लाभार्थ्यांना वितरित करण्यात आली आहेत. या मोहिमेवर 7.52 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली असून त्यापैकी 1.85 कोटी रुपये केंद्र सरकारने दिले आहेत. ज्यामध्ये केंद्र सरकारने 1.14 लाख कोटी जारी केले आहेत.

यासाठी अर्ज कसा करायचा ते जाणून घ्या
>> प्रधानमंत्री आवास योजनेच्या http://pmaymis.gov.in अधिकृत वेबसाइटवर जा.
>> येथे मेनूमध्ये ‘Citizen Assessment’ वर क्लिक करा आणि अप्‍लाय कॅटेगिरी निवडा.
>> येथे तुम्हाला अनेक पर्याय मिळतील. तुमच्या आवडीनुसार पर्याय निवडा.
>> यानंतर तुम्हाला आधार नंबर भरावा लागेल आणि चेकवर क्लिक करावे लागेल.
>> यानंतर ऑनलाइन फॉर्म उघडेल. या फॉर्ममध्ये मागितलेली माहिती भरा.
>> त्यानंतर कॅप्चा कोड टाका, व्हेरिफाय करा आणि सबमिट करा.
>> सबमिट केल्यानंतर, तुमच्या स्क्रीनवर एक अर्ज क्रमांक प्रदर्शित होईल. त्याची प्रिंट काढा आणि सेव्ह करा.