हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Bank FD : जर आपल्याला कोणतीही जोखीम न घेता चांगले उत्पन्न मिळवायचे असेल तर फिक्स्ड डिपॉझिट हा चांगला पर्याय ठरेल. कारण, सध्याच्या काळात अनेक वर्षांनंतर FD वर 8 टक्क्यांहून जास्तीचा रिटर्न मिळत आहे. पंजाब आणि सिंध बँकेच्या नेतृत्वाखालील काही सार्वजनिक क्षेत्रातील बँका दरवर्षी 8-8.5% पर्यंत व्याजदर देत आहेत.
हे जाणून घ्या कि, बँकांमध्ये निधीच्या कमतरतेमुळे बँकांकडून ग्राहकांना 200 ते 800 दिवसांच्या कालावधीसाठी मजबूत व्याजदर देत आहेत. कारण यावर्षी डिपॉझिट्सच्या तुलनेत क्रेडिट ग्रोथ चांगली झाली आहे. जानेवारीत किरकोळ चलनवाढीत 6.52 टक्क्यांनी वाढ झाल्यानंतरही फिक्स्ड डिपॉझिट्सवर किमान 7 टक्के व्याजदर हे ग्राहकांसाठी चांगले लक्षण आहे. Bank FD
आर्थिक वर्ष 2022 च्या 10 महिन्यांत महागाई 6 टक्क्यांहून जास्त होती. यामुळे, RBI ने सलग सहा वेळा रेपो दरात वाढ केली. ज्यामुळे रेपो दर 250 bps ने वाढून 6.50% च्या पातळीवर पोहोचला आहे.
13 जानेवारी 2023 रोजी 15 दिवसांच्या आत क्रेडिट ग्रोथमध्ये 16.5 टक्के वाढ दिसून आली आहे. तर डिपॉझिट ग्रोथ 10.6 टक्के राहिला. इतर अनेक कारणांमुळेही दर वाढले आहेत, कारण पोस्ट ऑफिसच्या एका वर्षाच्या डिपॉझिट्सवरील व्याज दर 6.6% तर दोन वर्षाच्या डिपॉझिट्सवरील व्याजदर 6.8% आहे. त्याच वेळी, 10 वर्षांच्या सरकारी सिक्योरिटीजवरील यील्ड फक्त 7.35% आहे. Bank FD
‘या’ बँका देत आहेत सर्वाधिक व्याज दर
सेंट्रल बँकेकडून 444 दिवसांसाठी ज्येष्ठ नागरिकांना 7.85 टक्के तर सर्वसामान्य नागरिकांना 7.35% व्याज दिले जात आहे.
युनियन बँक ऑफ इंडियाकडून 800 दिवसांच्या डिपॉझिट्सवर किरकोळ ग्राहकांना 7.30 टक्के तर ज्येष्ठ नागरिकांना 7.80 टक्के व्याज मिळत आहे.
SBI कडून 400 दिवसांसाठी सर्वसामान्य नागरिकांना 7.10% तर ज्येष्ठ नागरिकांना 7.60 टक्के व्याज दिले जात आहे.
त्याचप्रमाणे पंजाब अँड सिंध बँकेकडून 221 दिवसांच्या बकेटमध्ये रिटेल डिपॉझिटर्सना 8% तर ज्येष्ठ नागरिकांना 8.50% व्याज मिळत आहे. Bank FD
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://punjabandsindbank.co.in/content/interestdom
हे पण वाचा :
SBI च्या सर्वोत्तम FD योजनेअंतर्गत ग्राहकांना दिला जातोय सर्वाधिक व्याज दर
HDFC Bank ने ग्राहकांना दिला मोठा धक्का, ग्राहकांच्या EMI मध्ये झाली वाढ
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या किंमतीत बदल, पहा आजचे नवीन भाव
Vivo V27 : Vivo ने लाँच केले रंग बदलणारे 2 Mobile; 50 MP कॅमेरा अन् बरंच काही
adhaar Card Pan Card Link : आयकर विभागाने जारी केली महत्वाची सूचना, 31 मार्चपर्यंत लिंक करा अन्यथा…