‘या’ सरकारी बँकेने ग्राहकांना दिली भेट! होम, ऑटो आणि पर्सनल लोन झाले स्वस्त, आता दरमहा EMI वर होणार बचत

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सेंट्रल बँक ऑफ इंडिया

या 4 बँकांनीही केली आहे कपात
गेल्या आठवड्याच्या सुरूवातीला युनियन बँक ऑफ इंडिया, इंडियन ओव्हरसीज बँक आणि बँक ऑफ महाराष्ट्र यांनीही आपल्या MCLR मध्ये अनुक्रमे 0.05, 0.10 आणि 0.10 टक्क्यांनी कपात केली. युको बँकेनेही आपल्या MCLR मध्ये 0.05 टक्क्यांनी कपात केली आहे. युनियन बँक ऑफ इंडिया आणि इंडियन ओव्हरसीज बँकेची कपात ही सर्व कालावधीच्या कर्जासाठी आहे. इंडियन ओव्हरसीज बँकेचे नवीन दर हे 10 सप्टेंबरपासून लागू झाले आहेत. इंडियन ओव्हरसीज बँकेच्या एका वर्षाच्या कर्जाचे MCLR 7.55 टक्के (याआधीचे 7.65 टक्के), तीन महिन्यांच्या आणि सहा महिन्यांच्या कर्जाचे MCLR अनुक्रमे अनुक्रमे 7.45 आणि 7.55 केले गेले आहेत.

या कपातीनंतर युनियन बँक ऑफ इंडियाच्या एक वर्षाच्या कर्जावरील MCLR आधीच्या 7.25 टक्क्यांवरून 7.20 टक्क्यांवर गेला आहे. त्याचबरोबर बँक ऑफ महाराष्ट्रने काही निवडलेल्या कर्जाच्या अटींवर MCLR कमी केला आहे. बँक ऑफ महाराष्ट्रने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, बँकेने एक वर्षाच्या आणि सहा महिन्यांच्या कर्जावर MCLR हा अनुक्रमे 7.40 टक्क्यांवरून 7.30 टक्के व 7.30 टक्क्यांवरून 7.25 टक्के केलेलले आहेत. एक दिवसीय, एक महिन्याच्या आणि तीन महिन्यांच्या कर्जासाठी MCLR अनुक्रमे 6.80 टक्के, 7 टक्के आणि 7.20 टक्के करण्यात आले आहे.

युको बँकेने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, एक वर्षाचा MCLR ही कपातीनंतर 7.40 टक्क्यांवरून 7.35 टक्के करण्यात आली आहे. ही कपात इतर सर्व मुदतीच्या कर्जासाठी लागू असेल.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

Leave a Comment