सरकार लवकरच लॉन्च करणार BSNL ची 4G सेवा; सिमला आलीये प्रचंड मागणी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | सध्या, एअरटेल, जिओ, वोडाफोन, आयडिया या टेलिकॉम कम कंपन्यांनी त्यांचे रिचार्जचे दर वाढवलेले आहे. त्यामुळे अनेक युजरचे आता बीएसएनएलकडे वळताना दिसत आहे. सध्या देशांमध्ये बीएसएनएल सिमला मोठ्या प्रमाणात मागणी आलेली आहे. परंतु आता देशांमध्ये बीएसएनएलची 4G सेवा कधी सुरू होणार आहे? याबाबत सगळेजण वाट पाहत आहेत. बीएसएनएल आणि एमटीएनएल मध्ये लवकरात लवकर 4G आणले पाहिजे सेवा सुरू करण्याच्या आश्वासन देखील देण्यात आले आहे.

याबाबत दळणवळण मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी सांगितले की, ‘”बीएसएन, एलटीडीएस तेजस सीडी या आमच्या सर्व कंपन्या आता एकत्र येत आहेत. भारताने केवळ सेवांचा पुरवठादार बनू नये, तर आपण उत्पादनांचे पुरवठात देखील बनले पाहिजे. मी हमी देतो या प्रयत्नासाठी आम्ही एक लाख RAN तैनात करण्याच्या दिशेने वाटचाल करत आहोत. भारतामध्ये तंत्रज्ञान विकसित करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. ज्याचा वापर केवळ देशांतर्गत वापरासाठीच नाही तर निर्यातीसाठी देखील केला जाणार आहे.”

पुढे सिंधिया म्हणाले की, “गेल्या वर्षी दूरसंचार उपकरणांची निर्यात 20 हजार कोटी रुपयांच्या जवळपास होती. त्यामुळे आता सरकारला नियमकाची भूमिका बाजावण्याऐवजी या क्षेत्राच्या वाढीस सक्षम बनण्याची देखील इच्छा आहे. तसेच 5G मध्ये वेगवान वाढ पाहिल्यानंतर भारत आता 6 G तंत्रज्ञानाच्या विकासात अग्रेसर होण्यासाठी काम करत आहे. भारत 5 Gसाठी ॲप्स आणि सोल्युशनच्या विकासावर काम करत आहे.” असे देखील सिंधिया यांनी सांगितलेले आहे.