शासनाला हिंदू धर्मातील धार्मिक परंपरा खंडित करण्याचा अधिकार नाही : संभाजी भिडे गुरुजी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

शासनाने पायी वारीला परवानगी नाकारली आहे. तसेच ह.भ.प. बंडातात्या कराडकरांवरही कारवाई केली. शासनाच्या या निर्णयाच्या व बंडातात्या कराडकरांवरील कारवाईच्या निषेधार्थ श्री शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजीराव भिडे गुरुजी यांच्या प्रमुख उपस्थित सोमवारी कराड येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून ते तहसील कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला. यावेळी भिडे गुरुजींनी बंडातात्या कराडकर यांच्यावर केलेल्या कारवाईबाबत मत व्यक्त केले. बंडातात्या कराडकर यांना स्थानबद्ध करण्यात आले आहे. ही बाब अत्यंत निंदनीय असून शासनाला हिंदू धर्मातील धार्मिक परंपरा खंडित करण्याचा कोणताही अधिकार नाही, असे भिडे गुरुजी यांनी म्हंटले आहे.

यावेळी इतिहास अभ्यासक प्रा. के. एन. देसाई, श्री. शिवप्रतिष्ठान, हिंदूस्थानचे जिल्हा कार्यवाह केदार डोईफोडे, कराड तालुका कार्यवाह सागर आमले, डॉ. प्रवीण माने यांच्यासह अनेक धारकरी उपस्थित होते. दरम्यान, तहसिलदारांना निवेदन दिल्यानंतर संभाजीराव भिडे (गुरुजी) पोलिसांनी ह.भ.प. बंडातात्या कराडकरांना स्थानबद्ध केलेल्या कराड तालुक्यातील करवडी येथील श्रीकृष्ण गोपालन केंद्राकडे धारकऱ्यांसोबत रवाना झाले.

यावेळी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे गुरुजी म्हणाले कि, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने पंढरपूर पायी वारीला विरोध केला आहे. परंतु, जाहीर सभा, निवडणुका, राजकीय लोकांचे लग्न सोहळे व वाढदिवस आदींना शासन परवानगी देते. शासनाने पायी वारीला विरोध करून हिंदू धर्मातील धार्मिक परंपरा व संस्कृती खंडित केल्याने तमाम हिंदू बांधवांच्या भावना दुखावल्या आहे.

Leave a Comment