2020 ते 2022 या कालावधीत अनेक नैसर्गिक आपत्ती आल्या. अनेकवेळा परिस्थिती निर्माण झाली तर अनेक वेळा कोरडा दुष्काळ देखील निर्माण झाला. यावेळी शेतकऱ्यांचे आणि त्यांच्या शेतीकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. आता सरकारने शेतकऱ्यांनाही मदत देण्याचे आश्वासन केले होते.
आता तीच मदत द्यायला सरकार देखील पुढे आलेले आहे. शेतकऱ्यांचे जे काही नुकसान झाले आहे. त्यांना मदत वाटपासाठी 106 कोटी 64 लाख 94 हजार रुपये निधी वितरित करण्यास आता शासनाने मान्यता दिलेली असते. याची माहिती मदत व पुनर्वसन आपत्ती व्यवस्थापन मंत्री अनिल पाटील यांनी दिलेली आहे.
शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे. त्यामुळे आता सरकारच्या या निर्णयामुळे ज्या काही शेतकऱ्यांचे त्यांच्याशी पिकाचे नुकसान झाले आहे. त्या शेतकऱ्यांना लवकरच सरकारकडून मदत मिळणार असल्याचे देखील विश्वास मंत्री पाटील यांनी सांगितले आहे.
गेल्या दोन वर्षात अनेकवेळा नैसर्गिक आपत्ती आली शेतकरी आणि मालमत्तेचे नुकसान झाले. अशावेळी शेतकरी आणि नागरिकांकडून त्या नुकसानीची भरपाई मिळावी अशी मागणी होती. परंतु या मदत मागणीच्या प्रस्तावात अनेक अडथळे येत होत्या. तर ते अडथळे दूर झाले आहे आणि निधी वाटपास मान्यता दिली आहे.
विभागीय आयुक्त कार्यालयाकडून याबाबत प्राप्त झालेली. निधी मागणीचे प्रस्ताव देखील लांबणीवर गेलेली होते. परंतु आता हे सगळे प्रस्ताव सरकारकडून मान्य करण्यात आलेले आहेत. या प्रस्तावालाचा माननीय मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली राज्य सहकारी समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आलेली आहे. आणि ती निधी मंजूर करण्यात देखील आलेली आहे.