सरकारने सुरू केले सक्षम ॲप; 10 लाख तरुणांना मिळणार नोकऱ्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली | सरकार डिजिटल इंडियाला मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन देत आहे. या माध्यमातून सरकार लोकांना सेवा उपलब्ध करून देत आहे. रोजगार संबंधित सेवा देण्यासाठी सरकारने एक पोर्टल सुरू केले आहे. या पोर्टलच्या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांना नोकऱ्या मिळू शकतील असा अंदाज आहे. या पोर्टलच्या माध्यमातून एमएसएमई कंपन्यांना कामगारांशी डायरेक्ट संपर्क करता येणार आहे. या क्षेत्राशी संबंधित लोकांना रोजगार मिळण्याससाठी याची मदत होणार आहे. यामुळे प्रत्येक कामगार मोठ्या कंपनीशी जोडला जाऊ शकतो.

‘सक्षम ॲप’ या वेब पोर्टलची सुरुवात गेल्या महिन्यात केली गेली होती. आता या प्रोजेक्टची सुरुवात पायलेट प्रोजेक्टच्या आधारावर केली आहे. म्हणजेच काही जिल्ह्यांमध्ये या वेबसाइटची सद्ध्या सुरुवात केली आहे. हळूहळू याचा विस्तार इतर जिल्ह्यांमध्येही केला जाईल. या पोर्टलमुळे कंपनी आणि कामगार यांच्यातील अंतर कमी होऊन त्यांना एकमेकांच्या गरजेनुसार कंपन्यांना कामगार आणि कामगारांना त्यांच्या कौशल्यामुळे रोजगार मिळू शकणार आहे. या पोर्टलबद्दल अधिक माहिती घेऊ.

टाइपैक म्हणजेच टेक्नोलॉजी इन्फोर्मेशन फोर कास्टिंग अँड असेसमेंट कौन्सिल ने एमएसएमई कंपन्यांच्या गरजा आणि कामगारांचे कौशल्य यांना एकमेकांशी जोडणारे ‘सक्षम’ नावाच्या रोजगार पोर्टलची सुरुवात 11 फेब्रुवारीला केली गेली होती. यामुळे कंपनी आणि कामगार यांना डायरेक्ट संपर्क करता येणार आहे. यामधून त्यांना सोप्या पद्धतीने रोजगार मिळू शकणार असल्याचे बोलले जाते. या पोर्टलच्या माध्यमातून जवळपास दहा लाख तरुणांना नोकऱ्या मिळतील, अशी शक्यता वर्तवली जात आहे. या पोर्टलचा वेब अड्रेस http://www.sakshamtifac.org असा आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

Leave a Comment