नवी दिल्ली । शुक्रवारी प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा (Pradhan Mantri Kuashal Vikas Yojana 3.0) तिसरा टप्पा शुक्रवारी सुरू झाला. त्याअंतर्गत देशातील तरुणांना रोजगाराभिमुख कौशल्ये देण्यात येतील. या योजनेंतर्गत युवकांना 300 हून अधिक अभ्यासक्रम उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. PMKVY 3.0 योजनेच्या 2020-21 कालावधीत 8 लाख लोकांना प्रशिक्षण दिले जाईल. या योजनेच्या तिसऱ्या टप्प्याचे उद्दीष्ट जिल्हा कौशल्य समित्या मजबूत करणे आणि सक्षम करणे तसेच मागणीवर आधारित कौशल्य विकास उपक्रमांना प्रोत्साहन देणे हे आहे.
948.90 कोटी खर्च केले जातील
यावर 948.90 कोटी रुपये खर्च केले जातील. मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे की, PMKVY 3.0 मध्ये जिल्हा कौशल्य समित्यांची जोडणी करून एक नवीन उपक्रम सुरू केला गेला आहे. PMKVY 3.0 प्रारंभिक पातळीवर तरुणांना व्यावसायिक प्रशिक्षण प्रदान करेल, जेणेकरून ते उद्योगाशी संबंधित संधींचा फायदा घेण्यास सक्षम असतील.
717 जिल्ह्यात सुरू केली
PMKVY ही एका देशाच्या, एका योजनेच्या दृष्टीने अग्रणी योजना आहे. कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयाने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, 28 राज्ये आणि आठ केंद्रशासित प्रदेशांच्या 717 जिल्ह्यांमध्ये PMKVY 3.0 सुरू करण्यात आले आहे. ‘आत्मनिर्भर भारत’ या दिशेने येणारी आणखी एक पायरी आहे. निवेदनात म्हटले आहे की, ही योजना अधिक विकेंद्रित पद्धतीने राबविली जाईल आणि यामध्ये राज्ये / केंद्रशासित प्रदेश आणि जिल्ह्यांची अधिक जबाबदारी असेल.
अशा प्रकारे नोंदणी करा
> PMKVY मध्ये नोंदणी करण्यासाठी आपल्याला https://pmkvyofficial.org वर जा आणि आपले नाव, पत्ता आणि ईमेल माहिती द्यावी लागेल.
> फॉर्म भरल्यानंतर अर्जदाराला ज्या तांत्रिक क्षेत्रामध्ये प्रशिक्षण घ्यायचे आहे ते निवडणे आवश्यक आहे.
> PMKVY मध्ये बांधकाम, इलेक्ट्रॉनिक्स आणि हार्डवेअर, फूड प्रोसेसिंग, फर्निचर आणि फिटिंग्ज, हस्तक्राफ्ट, रत्ने व ज्वेलरी आणि लेदर टेक्नॉलॉजी अशी जवळपास 40 तांत्रिक क्षेत्रे आहेत.
> यामध्ये प्राधान्यकृत तांत्रिक क्षेत्राचे अतिरिक्त तांत्रिक क्षेत्र देखील निवडावे लागेल.
> ही माहिती भरल्यानंतर तुमचे प्रशिक्षण केंद्र निवडावे लागेल.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.