औरंगाबाद । जुन्या मोंढ्यामधील हमाल, कामगारांची दोनशे ते अडीचशे संख्या आहे लॉकडाउन लागण्याच्या पहिले हमाल कामगार दररोज तीनशे ते चारशे रुपये कमत होते . पण आता या हमाल कामगारांवर ५० ते १०० रुपये चार तासांमध्ये मिळत आहे. 50 ते 100 रुपया मध्ये हमाल कामगाराला आपले घर परिवार चालवा लागत आहे.
हमाल कामगारांना शासनाकडून कोणतीही मदत त्यांना झालेली नाही, असे हमाल कामगारांकडून सांगण्यात येत आहे. काही हमाल कामगारांना आम्ही विचारणा केली असताना असं सांगण्यात आले की, आम्हाला घर चालवण्यासाठी व्याजाने पैसे काढावा लागत आहे. त्या पैशांमध्ये आमच घर परिवार चालवावा लागत आहे. लॉकडाउन असल्याकारणाने मोंढा फक्त चार तास उघडा राहतो. तेच चार तास बोलता बोलता निघून जातात कधीकधी तर आम्हाला एकही रुपया मिळत नाही. तसेच आल्या पावली आम्हाला वापस जावं लागतं मग त्यादिवशी आमच्या परिवाराचा कसं त्यासाठी आम्हाला व्याजाने पैसे काढून आमचा उदरनिर्वाह करावा लागत आहे. आमची शासनाला कळकळीची विनंती आहे की आम्हाला थोडीफार का होईना मदत करावी जेणेकरून आमच्या परिवाराला दोन वेळचं जेवण मिळेल.