दिलासादायक !! कोरोना रुग्णसंख्येचा आकडा 4 लाखांच्या आत

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशात कोरोनाने हाहाकार केला असताना आता काहीशी दिलासादायक बातमी समोर येत आहे. गेल्या 24 तासात प्रथमच कोरोना रुग्णसंख्येचा आकडा 4 लाखांच्या आत आला आहे. देशात मागील 24 तासात 3 लाख 66 हजार 161 नवीन कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 3 हजार 754 कोरोनाग्रस्तांना प्राण गमवावे लागले.

देशात रविवारी दिवसभरात तीन लाख ६६ हजार १६१ नवीन करोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. तर तीन लाख ५३ हजार ८१८ रुग्ण करोनावर मात करून घरी परतले आहेत.

भारतातील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा 2 कोटी 26 लाख 62 हजार 575 वर गेला आहे. आतापर्यंत देशात 1 कोटी 86 लाख 71 हजार 222 रुग्ण बरे झाले आहेत. तर
आतापर्यंत 2 लाख 46 हजार 116 रुग्णांनी कोरोनामुळे प्राण गमावले.

ब्रेकिंग बातम्या सर्वांत अगोदर मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 9028429273 हा नंबर तुमच्याकडील WhatsApp ग्रुपला Add करा.

You might also like