वृत्तसंस्था । कोरोना विषाणू संसर्गाच्या सुरुवातीच्या काळात तबलिगी जमातीचा मुद्दा चांगलाच गाजला होता. देशभरातून यावर प्रतिक्रिया व्यक्त कऱण्यात आल्या होत्या. आता सरकारने तबलिगी जमातीत असणाऱ्या २,२०० परदेशी नागरिकांना पुढचे दहा वर्षे भारतात येण्यास बंदी घातली आहे. तबलिगी जमातीच्या कार्यक्रमांमध्ये त्यांचा समावेश असल्याने सरकारने हा निर्णय घेतला आहे. पुढचे दहा वर्षे कोणत्याही कारणाने ते भारतात येऊ शकणार नाहीत. त्यांचा व्हिसा मंजूर केला जाणार नाही अशी माहिती शासकीय सूत्रांकडून मिळाली आहे.
यावर्षीच्या एप्रिल महिन्यात तबलिगी जमातीच्या क्रियाकल्पामध्ये समावेश असणाऱ्या व्हिसा च्या नियमांचे उल्लंघन केलेल्या ९६० परदेशी नागरिकांवर केंद्रीय गृह मंत्रालयाने बंदी घातली होती. तशी माहिती गृहमंत्रालयाने दिली होती. या लोकांनी दिल्लीतील निजामुद्दीन मरकज ला उपस्थिती लावली होती. तसेच देशात कोरोना संक्रमणामध्ये या जमातीचा महत्वाचा भाग असल्याचे सरकारने सांगितले होते. त्यानंतर याच्याशी संबंधित २,१०० परदेशी नागरिक १ जानेवारीपासून भारतात येऊन गेल्याचे सांगण्यात आले होते. त्यातील ८२४ नागरिक देशाच्या विविध भागात गेले होते. २१६ निजामुद्दीन मरकज मध्ये राहिले होते आणि बाकीचे संचारबंदीच्या आधी भारताबाहेर गेले होते.
https://twitter.com/ani_digital/status/1268514657104302082
मोठ्या संख्येने हे लोक देशाच्या वेगवेगळ्या भागात गेले होते. ८२४ लोकांची माहिती २५ मार्च ला सरकारला देण्यात आली होती. २८ आणि २९ मार्च सर्व राज्यांमध्ये या लोकांना शोधण्याची सूचना जरी करण्यात आली होती. नंतर त्यांची तपासणी करून त्यांना विलगीकरणात ठेवण्यात आले होते. देशभर या लोकांच्या क्रियांवर लक्ष ठेवण्यास सांगण्यात आले होते. आता सरकारने या जमातीशी संबंधित या परदेशी नागरिकांना देशात येण्यासच बंदी घातली आहे.