भारत सरकार आता पाकिस्तानचे पाणी रोखणार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

आंतरराष्ट्रीय| सिंधू, चिनाब आणि झेलम या भारतातून पाकिस्तानकडे वाहात जाणाऱ्या नद्यांचा प्रवाह यमुनेकडे वळविण्याचा निर्णय भारताने घेतला आहे.काश्मिरात पुलवामा येथे केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या जवानांवर झालेल्या भीषण हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर ही पावले उचलली जात आहेत, अशी माहिती केंद्रीय जलसंपदा मंत्री नितीन गडकरी यांनी दिली.

उत्तर प्रदेशात बागपत येथे एका कार्यक्रमात गडकरी बोलत होते. ते म्हणाले की या तिन्ही नद्यांवर धरण प्रकल्प बांधून हे पाणी अडवून यमुनेकडे वळविले जाईल. त्यामुळे यमुनेच्या पाण्यातही मोठय़ा प्रमाणात वाढ होईल.अर्थात अधिकाऱ्यांच्या मते असा प्रवाह अडवण्यासाठी किमान 100 मीटर उंचीची धरणे बांधणे आवश्यक असून त्यासाठी किमान सहा वर्षांचा कालावधी लागेल. म्हणजेच पाकिस्तानची प्रत्यक्ष पाणी-कोंडी होण्यासाठी सहा वर्षांचा कालावधी लागणार आहे.नुकत्याच आलेल्या माहितीनुसार नदी जोड प्रकल्प देखील सरकारच्या विचारधीन आहे अस समजते.

Leave a Comment