Government Scheme For Girls | आपले महाराष्ट्र शासन हे समाजातील विविध घटकांसाठी अनेक योजना आणत असतात. जेणेकरून त्यांना चांगला फायदा होईल आणि त्यांचे आयुष्य देखील त्यांना चांगले घालवता येईल. अशातच राज्य सरकार महिलांसाठी आणि मुलींसाठी प्रामुख्याने अनेक योजना राबवतात. महिला सक्षमीकरण व्हावे तसेच स्त्रियांचे जीवन सुधारावे, त्यांना त्यांच्या शिक्षणाला चालना मिळावी.यासाठी सरकारने अनेक योजना काढलेले आहेत.
असं म्हणतात की, मुलगी शिकली प्रगती झाली. एक मुलगी शिकली तर ती संपूर्ण कुटुंबाला शिकवते. यानुसारच आता महाराष्ट्र सरकारने उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींसाठी एक मोठी घोषणा केली आहे. राज्यामध्ये अनेक अशा मुली आहेत. ज्यांना आर्थिक अडचणीमुळे उच्च शिक्षण घेता येत नाही. आता त्यांच्यासाठी सरकारने नवीन घोषणा केली आहे. त्या मुलींचे शिक्षण खंडित होऊ नये आणि त्यांचे जीवन म्हणून सुधारावे यासाठी ही घोषणा केलेली आहे.
आता राज्यातील मुलींना मोफत उच्च शिक्षण घेता येणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्रातील प्रत्येक मुलीला जून 2024 पासून उच्च शिक्षण मोफत देण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे त्या विद्यार्थ्यांना वस्तीगृह मिळत नाही. त्यांना दर महिन्याला ठराविक रक्कम देखील उपलब्ध करून देणार आहे.
त्याचप्रमाणे उच्च शिक्षण घेणाऱ्या मुलींना शिक्षणासाठी वस्तीगृह मिळत नाही, अशा मुलींना दर महिन्याला 5 हजार 300 रुपये देखील देण्यात येणार आहे. तसेच महाराष्ट्रातील प्रत्येक मुलीला शिक्षण प्रवास राहणे आणि भोजन देखील मोफत केले जाणार आहे. उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी याबाबतची माहिती दिली.
23 फेब्रुवारी 2024 रोजी पुण्यश्लोक आहिल्याबाई होळकर सोलापूर विद्यापीठात रुसा निधीतून उभारलेल्या परदेशातील विद्यार्थ्यांसाठी वस्तीगृहाच्या उद्घाटना वेळी चंद्र चंद्रकांत पाटील यांनी ही घोषणा केलेली आहे. त्यामुळे आता सरकारच्या या निर्णयामुळे राज्यातील सर्व मुलींना कोणतेही शुल्क न देता उच्च शिक्षण घेता येणार आहे. ही महिलांच्या प्रगतीसाठी खूप मोठी गोष्ट आहे.