पेट्रोल डीझेल होणार महाग | पाणी संकटावर मात करण्यासाठी केंद्र सरकार लावणार पेट्रोल डिझेलवर कर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली |देशभर या वर्षी दुष्काळाचे संकट होते. या संकटावरमात करण्यासाठी केंद्र सरकार नवीन योजना आखण्याच्या तयारीत आहे. केंद्र सरकार या योजना पूर्ण करण्यासाठी पेट्रोल डिझेलवर अतिरिक्त कर लावण्याच्या तयारीत आहे. यासंदर्भात येत्या अर्थ संकल्पात घोषणा होण्याची शक्यता आहे.

नरेंद्र मोदींनी निवडणुकीत घोषणा केल्या प्रमाणे नव्याने शपथ घेतल्या बरोबर नवीन जल मंत्रालय निर्माण केले आहे. त्या खात्याला निधी देण्यासाठी आणि पाणी समस्येवर कायमचा तोडगा काढण्यसाठी केंद्र सरकारच्या वतीने पेट्रोल आणि डीझेलवर अतिरिक्त कर लावण्यात येणार आहे. यासाठी पेट्रोलियम मंत्रालयाने देखील मंजुरी दिली आहे असे सूत्रांनी सांगितले आहे. त्यामुळे येत्या ५ तारखेला सादर होणाऱ्या अर्थसंकल्पात या संदर्भात अर्थमंत्री निर्मला सितारमण घोषणा करण्याची शक्यता आहेत.

केंद्र सरकार पेट्रोल आणि डिझेलवर ३० ते ३५ पैसे पाणी व्यवस्थापन कर लावणार आहे. त्यामुळे पाण्याच्या व्यवस्थापनासाठी निधी उपलब्ध होईल असा केंद्र सरकारचा मानसआहे. त्यामुळे येत्या काही दिवसात पेट्रोल डीझेल महाग होणार आहे. याआधी २०१८ मध्ये केंद्र सरकारने रोड आणि इन्फ्रास्ट्रक्चर टॅक्सच्या नावाखाली पेट्रोल आणि डिझेलवर ८ रुपये कर लवला गेला आहे. या पैशातून देशातील रस्ते व्यवस्थित करण्याचे काम सध्या वेगात सुरु आहे.

Leave a Comment