Government Subsidy : गव्हर्नमेंट सबसिडीतून सुरु करा ‘हे’ लघु उद्योग; प्रतिमहिना कमवा लाखो रुपये

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Government Subsidy) गेल्या काही काळात असे निदर्शनास आले आहे की, अनेक तरुण मंडळी खूप शिक्षण घेऊनही बेरोजगार आहेत. ज्यामुळे मानसिक ताण तणाव वाढून अनेकांनी आत्महत्या देखील केल्या आहेत. त्यामुळे आजकाल नोकरी मिळत नसेल तर भांडवल उभं करून व्यवसाय क्षेत्रात उडी घेण्याकडे कल वाढू लागला आहे. व्यवसाय करणे ही आजच्या काळजी गरज होऊ लागली आहे. न केवळ शिकलेली तरुण मंडळी तर शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातूनदेखील नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या नुकसानाला पर्याय म्हणून व्यवसाय क्षेत्राकडे पाहणे गरजेचे आहे.

दिवसेंदिवस बेरोजगार तरुणांची संख्या वाढू लागल्याने आता नोकऱ्यांच्या मागे न लागता एखादा व्यवसाय करायला हवा, अशी भावना तरुणांमध्ये उपजतेय. जी अजिबात चुकीची नाहीये. म्हणूनच या संपूर्ण परिस्थितीला लक्षात घेऊन सरकारच्या माध्यमातूनदेखील विविध योजना राबवल्या जात आहेत. (Government Subsidy)या योजनांतर्गत तरुणांना उद्योग व्यवसाय उभारणीसाठी आर्थिक मदत मिळते. या व्यवसायांच्या यादीत शेती संबंधित व्यवसायात डेअरी व्यवसायापासून ते शेतीमाल प्रक्रिया उद्योगांची उभारणी आणि सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगांना सरकारच्या योजनांमधून अनुदान मिळते.

तसेच तरुण मंडळींना गृहउद्योग तसेच घरगुती सामूहिक व्यवसायांना उभारणी देण्यासाठी देखील सरकारच्या योजनांकडून अनुदान वा विशेष निधी दिला जातो. आज आपण अशाच काही व्यवसायांची माहिती घेणार आहोत. (Government Subsidy) जे तरुण मंडळी तसेच शेतकरी देखील करू शकतात. या ववसायांसाठी सरकारकडून मदत दिली जाते. त्यामुळे अशा व्यवसायांची तुम्हाला माहिती असणे गरजेचे आहे. चला तर जाणून घेऊया.

तृणधान्यांची उत्पादने

केंद्र सरकारच्या माध्यमातून भरड धान्य आणि तृणधान्यांच्या उत्पादन वाढीसाठी मोठ्या प्रमाणावर प्रोत्साहन दिले जाते, याविषयी आपण सारेच जाणतो. तर यासाठी सरकारच्या काही योजना देखील अमलात आणलेल्या आहेत. ज्यांच्या माध्यमातून व्यावसायिकांना मोठा फायदा दिला जातो. (Government Subsidy) आहारात तृणधान्याला मोठे महत्व आहे आणि त्यामुळे यापासून बनवल्या जाणाऱ्या पदार्थांची देखील मार्केटमध्ये मागणी आहे. विशेष करून नाचणी किंवा मिलेटपासून बनवले जाणारे उत्पादन बाजारात मोठ्या प्रमाणात खपतात. स्थानिक पातळीवर या उत्पादनांना मोठे मार्केट आहे आणि त्यामुळे अशा उद्योगांना सरकार अनुदान देते. ज्याचा फायदा घेऊन तुम्ही अत्यंत कमी खर्चात अशी उतपणे बनवून आर्थिक फायदा घेऊ शकता.

नाचणीची बिस्किटे (Government Subsidy)

नाचणी हे आपल्या आहारातील मुख्य आणि अत्यंत महत्वप्राप्त असे तृणधान्य आहे. नाचणीची भाकरी तर आपण खातोच. पण बाजारात नाचणीपासून बनवली जाणारी बिस्किटेदेखील चांगल्या प्रमाणात खपतात. या व्यवसायासाठी देखल सरकारकडून अनुदान दिले जाते. त्यामुळे जर तुम्ही नाचणी बिस्किटांचा व्यवसाय सुरू केला तर चांगला आर्थिक लाभ घेऊ शकता. यासाठी तुम्हाला शुद्ध तूप, लोणी तसेच साखर अथवा गूळ, बेकिंग पावडर, व्हॅनिला पावडर आणि इतर पॅकिंग साहित्य आवश्यक असते. हा कच्चामाल घेण्यासाठी तुम्ही सरकारकडून मिळणाऱ्या अनुदानाचा वापर करू शकता. होलसेल दरात अशा वस्तू विकत घेतल्याने तुम्हाला आर्थिकदृष्ट्या चांगला लाभ होईल.

घरगुती लोणची

भारतीय आहारात लोणच्यांना खूप महत्व आहे. डाळ भात म्हटलं की तोंडी आंबट गोड लोणच्याची फोड लागतेच. त्यामुळे जवळपास प्रत्येक घरात आपल्याला लोणचे आढळून येते. (Government Subsidy) घरगुती स्वरूपात लोणचे बनवण्याचा व्यवसाय सुरु करता येतो. कमी खर्चात जास्त नफा मिळवून देणारा हा एक उत्तम व्यवसाय आहे. यासाठी लिंबू, कैरी तसेच हळद, मिरची, तेल असे पदार्थ लागतात. तुम्हाला कैरीचेच लोणचे बनवायला हवे असे काही नाही. तुम्ही लिंबू, मिरची, करवंद, आवळा, हळद तसेच फणस इत्यादी प्रकारचे लोणचे बनवून विक्री करू शकता. हे उत्पादन तयार करण्यासाठी तुम्हाला लागणारी आर्थिक मदत सरकारच्या योजनांमधून मिळेल.

घरगुती पापड

भारतीय आहारात जसे लोणचे महत्वाचे तसे पापड सुद्धा विशेष महत्वाचे आहेत. पापड बनवण्याला व्यवसायाचे स्वरूप देऊन तुम्ही चांगला पैसा कमावू शकता. अगदी घरच्या घरी कमी खर्चात तुम्ही पापड बनवून विक्री करून चांगली कमाई करू शकता. हा व्यवसाय सुरू करायचा असेल तर सरकारकडून चांगली सबसिडी मिळते. (Government Subsidy) या उद्योगांमध्ये तुम्ही पॅकेटमध्ये पॅकिंगचा वापर करून पापड विक्री करून कमाई करू शकता. जसा व्यवसाय वाढेल तसे तुम्ही सरकारच्या मदतीने यंत्रसामग्री खरेदी करून पापड उद्योग वाढवू शकता.