Tuesday, June 6, 2023

राज्यातील सत्तास्थापनेवरची ‘साडेसाती’ संध्याकाळी संपेल?

मुंबई प्रतिनिधी : राज्यातील सत्ताकोंडी संध्याकाळी फुटण्याचे संकेत आता मिळत आहेत. भाजपचे वरिष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनी संध्याकाळी ७.३० वाजता महत्वाची पत्रकार परिषद आयोजित केली आहे. या परिषदेत सत्तास्थापनेसाठीची आपली भूमिका स्पष्ट करू अशी माहिती त्यांनी प्रसार माध्यमांना दिली.

तर तिकडे मुख्यमंत्रीपदाच्या प्रखर मागणीला धरून लढणाऱ्या संजय राऊत यांनी सगळे चित्र चांगले असल्याची प्रतिक्रिया माध्यमांना दिली. सोबतच संध्याकाळपर्यत तुम्हाला सत्तास्थापनेबाबत माहिती मिळेल असेही सांगितले. त्यामुळे राज्यातील सत्तास्थापनेवरची साडेसाती संध्याकाळी संपेल का? हा आता प्रश्न उरला आहे.

सध्यातरी राज्यात सत्तास्थापनेच्या चाव्या सेना-राष्ट्रवादीच्या हातात आहेत. त्यामुळे सत्तास्थापनेच्या दृष्टीने शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्या राजकीय हालचाली वाढल्या आहेत. त्यानुसार राष्ट्रवादी नेत्यांची महत्वाची बैठक सुरु असल्याचे वृत्त हाती येत आहे. या बैठकीत सत्तास्थापनेबाबत राष्ट्रवादी काय भूमिका घेते यावर सगळ्यांचे लक्ष लागून आहे.