हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | राज्यातील महायुती सरकार हे शेतकऱ्यांसाठी नवनवीन योजना आणत आहेत. त्यामुळे आर्थिक दृष्टीने शेतकऱ्यांना चांगलाच फायदा होत आहे. त्याचप्रमाणे त्यांचे उत्पन्न देखील चांगले येत आहे. शेतकऱ्यांची हित साधण्यासाठी सरकार नेहमीच तत्पर असते. सरकारने शेतकऱ्यांसाठी अनेक योजना काढलेल्या आहेत. त्यातीलच एक योजना म्हणजे सौर कृषी पंप योजना शेतकऱ्यांना 24 तास वीज मिळावी. तसेच विजेचे मिल माफ व्हावे. कृषी पंपासाठी त्यांना जास्त वेळ वाट पाहावी लागू नये, यासाठी ही योजना सुरू केली होती. मागील वर्षी सरकारने ध्यानाला प्रतिहेक्टरी 20 हजार रुपये एवढा बोनस दिला होता. परंतु आता यावर्षी या बोनसमध्ये वाढ करून 25 हजार रुपये हेक्टरी बोनस दिला जाईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली आहे.
तिरोडा तालुक्यातील धापेवाडा सिंचन योजना टप्पा दोन या कामाचे भूमिपूजन आणि जलपूजन कार्यक्रम रविवारी झाला. त्यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते. त्यावेळी त्यांनी सांगितले की, “आता धानाला 25 हजार रुपये बोनस मिळावा. आणि तुम्हाला तुमचा वकील म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठपुरावा करणार. आणि धान्याला निश्चित प्रति हेक्टरी 25000 रुपये बोनस जाहीर करणार.”अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली आहे.
सभेमध्ये देवेंद्र फडणवीस आणखी काय म्हणाले ?
यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, “महायुती सरकारने लाडकी बहीण राबवलेल्या इतर योजनामुळे मविआ नेत्यांची पोट दुखी होत आहे. त्यामुळे ते ही योजना बंद करण्यासाठी धडपड करत आहेत. त्याचप्रमाणे मविआ लबाडखोर आहे. आणि लबाड यांचे जेवल्याशिवाय खरे होत नाही. अशी टीका देखील त्यांनी केली. मविआ सरकार सत्तेवर असताना शेतकऱ्यांच्या अनेक योजना बंद केल्या. पण आम्ही शेतकऱ्यांसाठी अनेक सर्वाधिक योजना राबवून निधीदेखील दिला आहे.” असे त्यांनी सांगितले.
देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले की, “अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दिकी यांची गोळी झाडून हत्या करण्यात आली. ही राज्यातील अत्यंत दुर्दैवी घटना आहे. यातील दोन आरोपींना अटक देखील करण्यात आलेली आहे. आणि पोलीस या प्रकरणाचा आणखी शोध घेत आहे. या अशा परिस्थितीत देखील विरोधक माझ्या राजीनामाची मागणी करत आहे. यातूनच विरोधकांना किती खुर्चीचा मोह आहे हे दिसून येते.”