हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | कृषी क्षेत्रात अनेक बदल होत चाललेले आहेत. शेतकरी शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करताना दिसत आहे. पारंपारिक शेतीला प्राधान्य न देता, आता शेतकरी आधुनिक पद्धतीने शेती करण्याकडे जास्त लक्ष देत आहे. त्यामुळे शेतामध्ये आता अनेक नवनवीन पिकांची लागवड देखील होत असते. सरकार देखील शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावे. त्याप्रमाणे त्यांच्या शेतातील पिकाला चांगला बाजार भाव मिळावा. यासाठी विविध योजना आणत असतात आणि अनेक धोरण देखील आखत असतात.
अशातच आता सरकारने शेतमालाच्या निर्याती संदर्भात एक मोठा निर्णय घेतलेला आहे. सरकार आता केळी आणि आंब्यासह इतर 20 पिकांची निर्यात वाढवणार आहे. शेतमालाची निर्यात दुप्पट करण्याचा निर्णय आता सरकारने घेतलेला आहे. यासाठी त्यांनी एक कृषी आराखडा देखील तयार करायला आहे. परंतु याचा शेतकऱ्यांना नक्की कसा फायदा होईल हा प्रश्न उभा राहतोय? निर्यात धोरणाचा शेतकऱ्यांना फायदा होणार आहे आणि शेतमालाला देखील चांगला भाव मिळणार आहे.
कृषी निर्यात वाढवण्याचा केंद्र सरकारचा विचार
मिळालेल्या माहितीनुसार कृषी निर्यात वाढवण्याचा सरकारचा निर्णय आहे. यासाठी सरकारने 20 कृषी पिकाची यादी देखील तयार केलेली आहे. या 20 पिकांची निर्यात आता दुप्पट करण्याचा सरकारने निर्णय घेतलेला आहे. शेतकऱ्यांना देखील चांगला फायदा होणार आहे. शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पन्नाचा भाव अधिक मिळणार आहे. यावेळी वाणिज्य विभागाचे अतिरिक्त सचिव राजेश अग्रवाल यांनी शेतमालाच्या निर्यातीच्या संदर्भातील माहिती दिली आहे. त्याचप्रमाणे येथे तीन ते चार दिवसात या संदर्भात कृषी आराखडा देखील तयार केला जाणार आहे. जगाच्या तुलनेत भारताचा निर्यातीचा वाटा हा 2.5% आहे आणि हाच निर्यातीचा वाटा आता 4 ते 5 टक्के करण्याचा सरकार प्रयत्न करत आहे.
निर्यातीत कोणत्या पिकांचा समावेश होणार?
शेतमालाच्या निर्यातीत वाढ करण्याचा सरकारने निर्णय घेतलेला आहे. यावेळी द्राक्ष, डाळिंब, टरबूज, पेरू, हिरवी मिरची, शिमला मिरची, भेंडी, लसूण, कांदा, शेंगदाणे, काजू, म्हशीचे मांस, गूळ, नैसर्गिक मध आणि तूप यांसारख्या अनेक पदार्थांचा समावेश असणार आहे आणि निर्यातीच्या संदर्भात आराखड्यावर देखील सरकारचे काम सुरू आहे.
भारतीय कृषी उत्पादनांना मोठी मागणी
सध्या जगभरात भारतीय शेतमालाची मागणी वाढत आहे. त्यामुळे इतर उत्पादकांपर्यंत भारतातील शेतीमाल पोहोचवण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. सध्या अमेरिका, मलेशिया, कॅनडा, रशिया, जर्मनी, फ्रान्स, कोरिया, चीन, इंडोनेशिया, जपानी, युके यांसारख्या देशात भारतातील शेतमालाची निर्यात केली जाते.