सरकार लवकरच राबवेल Scrappage Policy, आता नवीन गाड्या होतील 30 टक्क्यांनी स्वस्त

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । दीर्घकाळापासून अडकलेले स्क्रॅप धोरण (Scrappage Policy) लवकरच अंमलात येऊ शकते. सरकारने याबाबतची माहिती संसदेत दिली आहे. केंद्रीय जनरल राज्यमंत्री व्ही. के. सिंह यांनी शनिवारी राज्यसभेत बोलताना सांगितले की, “वाहन स्क्रॅपिंग पॉलिसीसाठी एक कॅबिनेट नोट तयार केली गेली आहे.” एका प्रश्नाच्या उत्तरात ते म्हणाले की, या नवीन पॉलिसीची कॅबिनेट नोट अयोग्य व जुनी वाहने काढून टाकण्यासाठी तयार केली गेली आहे.” असा विश्वास आहे की स्क्रॅपिंग पॉलिसीच्या अंमलबजावणीमुळे सुस्तपणा आणि घसरणीचा सामना करत देशाच्या अर्थव्यवस्थेला बळ मिळेल. नवीन वाहनांची मागणी वाढल्यामुळे ऑटोमोबाईल क्षेत्राला चालना मिळेल. ग्राहकांना 30 टक्के स्वस्तात नवीन वाहने मिळतील. जुन्या वाहनांमुळे होणारे 25 टक्के वायू प्रदूषण कमी होईल. त्याचबरोबर स्क्रॅपिंग केंद्रांवर मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होतील.

नवीन कारचे रजिस्ट्रेशन फ्रीमध्ये होणार,असे मिळतील फायदे
आपली जुनी कार स्क्रॅपेज सेंटरला विकल्यानंतर एक प्रणाम पत्र दिले जाईल. हे दाखवून नवीन कार खरेदीदारांच्या कारचे रजिस्ट्रेशन फ्रीमध्ये केले जाईल. मीडिया रिपोर्टनुसार या निर्णयाद्वारे सुमारे 2.80 कोटी वाहने स्क्रॅपिंग पॉलिसीखाली येतील. या पॉलिसीमुळे देशात वाहनांचे जंक सेंटर मोठ्या प्रमाणात बांधले जातील. ज्यामुळे मोठ्या संख्येने रोजगाराच्या संधी निर्माण होतील. त्याचबरोबर ऑटोमोबाईल क्षेत्राला स्टील, अॅल्युमिनियम, प्लास्टिकसारखे भाग स्वस्त रीसायकलिंगमध्ये मिळू शकतील.

स्क्रॅपिंग पॉलिसी अर्थव्यवस्थेसाठी उपयुक्त ठरेल
वृत्तसंस्था पीटीआयच्या म्हणण्यानुसार लवकरच ही स्क्रॅपिंग पॉलिसी कॅबिनेटकडे पाठविली जाईल. तेथून मान्यता मिळाल्यानंतर ती राबविण्याची प्रक्रिया सुरू होईल. बर्‍याच माध्यमांच्या वृत्तांत असे सांगितले गेले आहे की, सध्याच्या साथीच्या काळात स्क्रॅपिंग पॉलिसी अर्थव्यवस्थेसाठी संजीवनी देण्याचे काम करेल.

आपल्या जुन्या मोटारींचे काय होईल?
15 वर्ष जुन्या असलेल्या वाहनांना रस्त्यांवरून काढून टाकण्याची तरतूद या स्क्रॅपिंग पॉलिसीमध्ये केली गेली आहे. परंतु अशा गाड्या चालविण्यासाठी दरवर्षी फिटनेस सर्टिफिकेट घ्यावे लागेल. यासह रजिस्ट्रेशन रिन्यूची फीदेखील दोन ते तीन पट करण्यात आली आहे. यामुळे वाहनधारकांना जुन्या वाहनांची विक्री करुन नवीन वाहने खरेदी करण्यास आकर्षित केले जाईल.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

Leave a Comment