नवी दिल्ली । पुढच्या वेळी जर तुम्ही एखाद्या सरकारी कार्यालयात गेलात आणि अधिकारी तुम्हाला म्हणाले की,” तो 5 मिनिटांसाठी योगा ब्रेक घेत आहे, तर तुम्हांला आश्चर्य वाटण्याची गरज नाही. किंबहुना, आपले कर्मचारी आता कामादरम्यान फ्रेश असावेत अशी सरकारची इच्छा आहे. त्यामुळे सर्व सरकारी कर्मचाऱ्यांना Y-Break App डाउनलोड करण्यास सांगितले गेले आहे. योगाच्या पद्धती आणि फायदे या अॅपमध्ये सांगितले गेले आहेत. हे अॅप आयुष मंत्रालयाने विकसित केले आहे. हा आदेश सरकारने 2 सप्टेंबर रोजी जारी केला.
कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाने (DoPT) दोन दिवसांपूर्वी जारी केलेल्या आदेशात सर्व मंत्रालयांना या अॅपचा प्रचार करण्यास सांगितले गेले आहे. आदेशात असे लिहिले आहे की,” भारत सरकारच्या सर्व मंत्रालये आणि विभागांना विनंती आहे की, Y-Break अॅपच्या वापराला प्रोत्साहन द्या.”
आयुष मंत्रालयाने मोबाईल अॅप्लिकेशन एका दिवसापूर्वी एका मोठ्या कार्यक्रमात लाँच केले होते ज्यात सहा मंत्र्यांनी भाग घेतला होता. DoPT मंत्री जितेंद्र सिंह देखील या कार्यक्रमाला उपस्थित होते आणि त्यांनी कायदा मंत्री किरेन रिजिजू यांना “कामाच्या ठिकाणी पाच मिनिटांसाठी योगाभ्यासाचे नियम बनवावेत जेणेकरून लोकं त्याचा लाभ घेऊ शकतील”.
यावेळी उपस्थित मंत्र्यांनी संपूर्ण सभेत अॅपवर प्रदर्शित योगासन केले. कायदा मंत्री किरेन रिजिजू म्हणाले होते की,” हे अॅप जंगलाच्या आगीप्रमाणे पसरेल.” आयुष मंत्री सर्वानंद सोनोवाल म्हणाले होते की,” पाच मिनिटांचा योग प्रोटोकॉल विशेषतः काम करणाऱ्या व्यावसायिकांसाठी त्यांच्या कार्यक्षमतेत वाढ करण्यासाठी आहे. हे कामाच्या ठिकाणी असलेला तणाव कमी करण्यासाठी, लोकांना ताजेतवाने करण्यासाठी आणि पुन्हा लक्ष केंद्रित करण्यासाठी डिझाइन केले गेले आहे. यात आसने, प्राणायाम आणि ध्यान यांचा समावेश आहे. आम्हाला माहित आहे की कॉर्पोरेट व्यावसायिकांना त्यांच्या कामामुळे अनेकदा ताण येतो. कंकरणाऱ्यांची लोकसंख्या लक्षात घेऊन, हे Y- ब्रेक विकसित केले गेले आहे, जे कामाच्या ठिकाणी कर्मचाऱ्यांना थोडा दिलासा देईल.”
2 सप्टेंबर रोजी जारी केलेल्या DoPT आदेशात म्हटले आहे की,”आयुष मंत्रालयाने 2019 मध्ये तज्ञ समितीच्या माध्यमातून हे अॅप तयार केले आणि विकसित केले, कामाच्या ठिकाणी 5 मिनिटांचा योग प्रोटोकॉल. हे मॉड्यूल जानेवारी 2020 मध्ये सहा प्रमुख महानगरांमध्ये (दिल्ली, मुंबई, चेन्नई) पायलट प्रोजेक्ट म्हणून लाँच करण्यात आले.” DoPT ने आपल्या आदेशात म्हटले आहे, “प्रतिसाद खूप उत्साहवर्धक होता.”