विधानसभा अध्यक्ष निवडीबाबत राज्यपाल भगतसिह कोशारींचे मुख्यमंत्र्यांना पत्र

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : विधानसभेच्या अध्यक्षपदाच्या निवडीसाठी महाविकास आघाडी सरकारकडून येणाऱ्या पावसाळी अधिवेशनात निर्णय घेतला जाणार आहे. दरम्यान, राज्यपाल भगतसिह कोशारी यांनी बुधवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना अध्यक्षपदाच्या निवडीबाबत पुन्हा आठवण करून दिली आहे. त्याबातचे तसे पत्रही राज्यपालांनी पाठवले आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या शिष्टमंडळाने अध्यक्षपदाच्या निवडीबाबत निवेदने दिली आहेत. त्यामुळे विधानसभा अध्यक्ष निवडीबाबत कळवावे, असे राज्यपाल कोशारी यांनी पत्राद्वारे म्हंटल आहे.

भाजपच्या शिष्टमंडळाने बुधवार, दि. 23 रोजी राज्यपाल भगतसिह कोशारी यांची भेट घेतली होती. यावेळी विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, चंद्रकांत पाटील आदी उपस्थित होते. यावेळी फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकार कोरोनाचे कारण सांगत दोन दिवस अधिवेशन घेत आहे. तसेच राज्यपालांनी पत्र पाठवल्यानंतर विधानसभा अध्यक्षांची निवडणूक घ्यावी लागते. हे सरकार विधानसभा अध्यक्षांचीही निवडणूक घेत नाही. आम्ही राज्यपालांकडे विंनती केली आहे कि, त्यांनी या सरकारकडून संवैधानिक जबाबदाऱ्या पाड पाडल्या जात नसल्याची बाब राष्ट्रपतींच्या निदर्शनास आणून द्यावी, अशी मागणी फडणवीस यांनी केली होती. त्याची आठवण करून देत आज राज्यपाल कोशारी यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांना पत्र पाठवले आहे.

 

या पत्रात त्यांनी म्हंटल आहे कि, विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी व त्याच्या शिष्टमंडळाने माझी भेट घेत निवेदनाद्वारे काही मागण्या केल्या आहेत. त्यामध्ये त्यांनी विधानसभा अधिवेशनाचा कालावधी वाढवावा, विधानसभा अध्यक्षांची निवड करावी, ओबीसी आरक्षण प्रलंबित असल्याने जिल्हा परिषदा निवडणुका स्थगित कराव्यात अशा मागण्या केल्या आहेत. हे विषय सध्या महत्वाचे असल्याने त्यावर योग्य ती कारवाई करून कळवावे, असा पत्राद्वारे राज्यपाल कोशारी यांनी म्हंटल आहे.