Tuesday, January 31, 2023

अंतिम वर्षाच्या परीक्षांवरुन राज्यपाल कोश्यारी आणि मुख्यमंत्री ठाकरे आमने सामने

- Advertisement -

मुंबई । संचारबंदीच्या निर्णयानंतर राज्यातील सर्व शाळा महाविद्यालये, शैक्षणिक संस्था प्रथम बंद करण्यात आल्या होत्या. मार्च पासूनचा काळ हा खरंतर परीक्षेचा काळ असतो. १० वी, १२ वी तसेच सर्व महाविद्यालयीन महत्वाच्या परीक्षा याच काळात असतात. मात्र यावर्षी कोरोनाचे राज्यावरील सावट पाहता संचारबंदी लागू केल्याने बहुतेक सर्व परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. दहावी, बारावीसोबत महाविद्यालयीन परीक्षा रद्द करण्यात आल्या होत्या. मात्र अंतिम वर्षाच्या विदयार्थ्यांच्या परीक्षा घेतल्या जातील असे जाहीर करण्यात आले होते. आता त्यावर विचार करावा आणि वेळ न दवडता लवकर त्यांच्या परीक्षा घेण्याचा निर्णय घ्यावा अशी मागणी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी केली आहे. 

दहावी, बारावीच्या परीक्षा घेतल्या जातील असे काही दिवसांपूर्वी सरकारने सांगितले होते. त्याचप्रमाणे अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांच्या परीक्षाही घेतल्या जाणार आहेत हे त्यापूर्वीच जाहीर करण्यात आले होते. मात्र अद्याप त्याबाबत पुढील कोणती कारवाई झाली नाही किंवा त्या विषयावर चर्चाही झाल्या नाहीत. कोश्यारी यांनी या मुद्द्याकडे लक्ष वेधत इतर क्षेत्रातील नियम शिथिल करीत असताना मोठ्या प्रमाणातील विद्यार्थ्यांचे हीत  लक्षात घेऊन या विषयावर लवकर निर्णय घेण्यात यावा अशी मागणी केली आहे. 

- Advertisement -

दरम्यान आता हळूहळू संचारबंदीचे नियम शिथिल करीत अर्थव्यवस्था सुरळीत करण्यासाठी सरकार पावले उचलत आहे. यामध्ये विविध क्षेत्रातील कामकाज सामाजिक अलगावचे नियम पाळून सुरु करण्याचा विचार केला जात आहे. काही ठिकाणी ते करण्यातही आले आहेत. केवळ कंटेन्मेंट झोनमधील नियम काटेकोरपणे पाळले जाणार आहेत. या पार्श्वभूमीवर विदयार्थ्यांच्या भविष्याच्या दृष्टीने परीक्षा लवकर घेण्याच्या निर्णयावर विचार करण्याची गरज आहे असे राज्यपालांचे म्हणणे आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.