औरंगाबाद : शहरात अंशतः लॉकडाऊन लागू असले तरी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पदवी अभ्यासक्रमाच्या परीक्षांच्या (द्वितीय व तृतीय वर्षाच्या) वेळापत्रकात कोणताही बदल झालेला नाही. 16 मार्च पासून परीक्षा सुरू होत असून कोरोनाचे सर्व नियम पाळण्याचे आदेश कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी दिले आहेत. विद्यार्थ्यांना ऑनलाईन व ऑफलाईन दोन्ही पर्याय उपलब्ध असतील.
लॉकडाऊन दरम्यान परीक्षा घेण्यासंदर्भात जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण तसेच जिल्हा प्रशासनाने घ्यावयाची काळजी व सर्व सूचना काटेकोरपणे पाळण्याचे आदेश विद्यापीठाने संबंधित सर्व केंद्र व महाविद्यालयांना दिले आहेत. एखादा विद्यार्थी आजारी आढळल्यास त्याची वेगळी बैठक व्यवस्था करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत या काळात परीक्षा नियोजित वेळापत्रकानुसारच होणार आहेत.
‘पेट’ची मॉक टेस्ट मोबाईल लॅपटॉपवर ही देता येणार
विद्यापीठाच्या वतीने ऑनलाइन पीएचडी एंट्रन्स टेस्ट अर्थात पेट (पेपर दुसरा) शनिवारी 13 मार्चला घेण्यात येणार आहे. ६ हजार 383 विद्यार्थी पहिला पेपर उत्तीर्ण झाले आहेत. आता( 13 मार्च) रोजी दुसरा पेपर घेण्यात येईल. या सर्व विद्यार्थ्यांना ही 11 व 12 मार्च रोजी मॉक टेस्ट देणे गरजेचे आहे. ही मॉक टेस्ट विद्यार्थ्यांना पहिला पेपर प्रमाणेच मोबाईल लॅपटॉप अथवा संगणकावर देता येईल, असे परीक्षा विभागाचे उपकुलसचिव डॉ. गणेश मंझा यांनी कळवले आहे.
औरंगाबाद जिल्ह्यासह राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा