मुक्ताईनगरमध्ये नाथाभाऊंनी दाखवलं भाजपला अस्मान! महाविकासआघाडी पॅनल्सची जोरदार घौडदौड

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव । एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर स्थानिक पातळीवर झालेल्या पहिल्याच निवडणुकीत भाजपचा पुरता धुव्वा उडाला आहे. मुक्ताईनगर तालुक्यातील 47 ग्रामपंचायतींपैकी ९ गावांमध्ये महाविकासआघाडी पुरस्कृत पॅनलचा विजय झाला आहे. तर इतर गावांमध्येही महाविकासआघाडी पुरस्कृत पॅनल्सची जोरदार घौडदौड सुरु आहे. (Mahavikas Aghadi govt panel wins in Muktainagar)

एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला तरी भाजपला फारसा फरक पडणार नाही. भाजपकडे त्यांची उणीव भरुन काढणारे नेते असल्याचा दावा गिरीश महाजन आणि रावसाहेब दानवे यांच्याकडून करण्यात आला होता. मात्र, आता मुक्ताईनगरमधील निकाल पाहता या संपूर्ण पट्ट्यात एकनाथ खडसे यांचेच वर्चस्व असल्याचे पुन्हा एकवार सिद्ध झाले आहे.

कोथळी ग्रामपंचायतीच्या निकालांवरुन खडसे परिवारात ‘गृहयुद्ध’
कोथळी ग्रामपंचायतीच्या निकालांवरुन खडसे परिवारात गृहयुद्ध सुरु झाले आहे. याठिकाणी पाच जागांवर शिवसेना तर सहा जागांवर भाजपचे उमेदवार निवडून आले. मात्र, आता भाजप आणि राष्ट्रवादीकडून आपल्या विजयाचे दावे-प्रतिदावे केले जात आहेत. कोथळी हे एकनाथ खडसे यांचे गाव आहे.

गिरीश महाजनांनी राखली लाज
गिरीश महाजन यांनी जामनेर तालुक्यातील आपले वर्चस्व राखले आहे. तालुक्यातील 90 टक्के ग्रामपंचायतींवर भाजपचा झेंडा फडकला आहे. मात्र, काही ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसने मोठी मुसंडी मारली आहे.

घरातच चंद्रकांत पाटलांना हरवलं, सेनेची विजयी पताका
शिवसेनेने चंद्रकांत पाटील यांच्या मूळ गावातील खानापूर गावात सत्तांतर घडवलं आहे. खानापूरमध्ये सेनेनं 6 जागांवर विजय मिळवला आहे. खानापूरमधील शिवसेनेचा विजय भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे. राज्यात महाविकास आघाडीची सत्ता असतानाही खानापूरमध्ये ही अनोखी युती झाली होती. स्थानिक पातळीवर का असेना, पण शिवसेनेविरोधात काँग्रेस-राष्ट्रवादी यांनी शड्डू ठोकत चक्क भाजपशी आघाडी केल्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं गेलं होते. मात्र, तरीही शिवसेनेच्या प्रकाश आबिटकरांनी विजय खेचून आणला.

बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Leave a Comment