Thursday, March 30, 2023

ग्रा.पं. सदस्याची प्रेयसीच्या घरात आत्महत्या ; मृतदेह ताब्यात न घेतल्याने दौलताबादेत तणावपूर्ण शांतता

- Advertisement -

औरंगाबाद :ग्रामपंचायत सदस्य तथा शिवसेनेचे उप तालुका प्रमुख सुनील प्रकाश खजिनदार यांनी गुरुवारी प्रेयसीच्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली.या नंतर आज नातेवाईक आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला.त्यामुळे गावातील वातावरण तणावपूर्ण झाले असून गावकऱ्यांनी दुकाने बंद केली आहे.यामुळे परिसराला कर्फ्यु चे स्वरूप प्राप्त झाले आहे.

पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की,शिवसेनेचे उपतालुका प्रमुख सुनील खजिनदार यांचे गावातीलच एका विवाहित महिलेसोबत गेल्या 10 ते 11 वर्षांपासून प्रेम संबंध होते.मात्र खजिनदार यांचे लग्न जमले होते.ही बाब गुरुवारी त्या विवाहितेला माहिती झाली त्यामुळे दोघांमध्ये कडाक्याचा वाद झाला.त्यानंतर खजिनदार यांनी प्रेयसीच्या घरातच गळफास घेऊन आत्महत्या केली.

- Advertisement -

ही घटना रात्री पोलिसांना कळताच दौलताबाद पोलीस ठाण्याच्या निरीक्षक राजश्री आढे,यांनी घटनस्थळी धाव घेत मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी घाटी रुग्णालयात हलविले. आज सकाळी मृतदेहाची उत्तरीय तपासणी करण्यात आली.व मृतदेह दौलताबाद येथील घरी नेण्यात आले.मात्र तेथे नातेवाईकांनी घातपाताचा संशय व्यक्त करीत, जो पर्यंत हत्येचा गुन्हा दाखल होणार नाही तो पर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही आणि अंतिम संस्कार देखील करणार नाही अशी भूमिका घेतली.

या भूमिकेमुळे गावात तणावाची परिस्थिती निर्माण झाली असून दौलताबाद परिसरात असलेल्या दुकानदारांनी आज त्यांची दुकाने बंद ठेवली. काही अनुचित प्रकार घडू नये या साठी पोलीस प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून अधिकची कुमक तैनात केली असून पोलीस प्रशासनाकडून दुपारपर्यंत खजिनदार यांच्या नातेवाईक मित्र परिवाराची समजूत काढण्यात येत होती.

औरंगाबाद जिल्ह्यासह राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group