दुर्दैवी! आजीसह नातवाचा पाण्यात बुडून मृत्यू

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी

पुलावरून दुचाकी नदीत कोसळून झालेल्या आपघातात आजीसह तिच्या नातवाचा पाण्यात बुडून र्दुदैवी मृत्यु झाला. मालन भगवान यादव वय ( ५७ ) पियुष शरद यादव ( वय ४ ) राहणार येरवळे ( ता. कराड ) असी मृतांची नावे आहेत. काल सांयकाळी कोळे-अंबवडे दरम्यान वांग नदीच्या पुलावर ही घटना घडली. देवदर्शनासाठी ते तिकडे गेले होते. यावेळी जिगरबाज स्वीमर तनुजा यादव या आठ वर्षाच्या मुलीने शर्थीने आजी अणि भावाला वाचवण्याचा प्रयत्न केला खरा मात्र नियतीने डाव साधला अणि दोघाचा त्यात मृत्यु झाल्याने मोठा अनर्थ झाला. तर वडील शरद यादव यांना वाचवत मोठा अनर्थ टाळला. सदरील घटनेची कोळे पोलीसात नोंद झाली आहे.

याबाबत घटनास्थळावरून व पोलीसांची माहिती अशी, येरवळे ( ता. कराड ) येथील एकाच कुंटूबातील चौघेजण शरद यादव आई मालन यादव समवेत दोन मुले तनुजा अणि पियुष दुचाकीवरून अंबवडे येथे देवदर्शनासाठी गेले होते. काल सांयकाळी देवदर्शन घेऊन ते घरी परतत होते. परतताना पुलावरून दुचाकी त्याची घसरली. त्याठिकाणी जुन्या पुलाचे बांधकाम सुरू असून खडी व वाळू त्याठिकाणी पसरली आहे. त्यामुळे फसगतीने चौघेही दुचाकासह साधारण २० फुट खोल नदीच्या डोहात पडले अणि बुडाले. यावेळी मात्र अंधार झाला होता. तिघांनाही पोहता येत नव्हते. प्रसंगावधान राखून पोहण्यात तरबेज असलेल्या तनुजाने बुडत असलेल्या आजीला अणि भावाला ओढत आणुन पाण्याबाहेर काढले. काठावर आणले. पुन्हा शर्थीचे प्रयत्न करून वडीलांना पाण्याबाहेर काढण्यासाठी ती पुन्हा पाण्यात गेली. बाहेर काढत असताना तोवर काठावरील आजी अणि भाऊ पुन्हा घसरून पाण्यात पडली. घटनेची माहिती मिळताच येरवळेसह परिसरातील नागरिकानी धाव तिकडे घेतली. पोलीसाना कळविण्यात आले. शोध मोहिम राबविली. त्यानंतर भावाला बाहेर काढण्यात यश आले. मात्र नियतीने तोवर डाव साधला अन् आजी अणि नातवाचा जीव त्यात गेला. वडील शरद यादव यांना वाचविण्यात तनुजा यशस्वी ठरली. रात्रीचा अंधार अणि पाण्यात आपल्या कुंटूबाला वाचवण्यासाठी तिने केलेले धाडस वाखाणण्याजोगे ठरले. तेही केवळ आठ वर्षाच्या जिगरबाज मुलीने जिवाची पर्वा न करता पोहण्याचा कलेचा पुरेपूर वापर करत तिघाचाही जीव वाचवण्यासाठी शर्थीने प्रयत्न केले खरे मात्र तिच्या धडपडीला पुर्णता यश आले नाही. आजी अणि भावाचा र्दुदैवी मृत्यु त्यात झाला. घटनेची बातमी वाऱ्यासारखी विभागात पसरली. येरवळे गाव व परिसरात माहिती मिळताच शोककळा पसरली आहे . त्यानंतर ग्रामस्थांना तिकडे धाव घेतली. मदतकार्य राबविले. मृत मालन व पियुष यांच्यावर रात्री उशिरा येरवळेत अंत्यसंस्कार करण्यात आले. कोळे दुरक्षेत्रच्या कर्मचाऱ्यानी घटनास्थळी भेट दिली पंचनामा केला आहे. सहाय्यक पोलीस निरिक्षक गणेश कड यांच्या मार्गदर्शनाखाली हावलदार अमोल देशमुख हावालदार विठ्ठल खाडे हावदार कुलकर्णी त्याकामी अधिक तपास करत आहेत.

शरद यादव शेतकरी कुटुंबातील आहेत. त्यांना पोहता येत नाही. मात्र मुलगी तनुजाला त्यांनी स्वीमींगला दाखल केले आहे. त्याठिकाणी पोहण्याचे प्रशिक्षण सुरू आहे. त्यात ती तरबेजही झाली आहे. पोहण्याच्या स्पर्धेत तिने ठिकठिकाणी बक्षिसे पटकावली आहेत. कालच्या घटनेत कुंटूबाचा जीव वाचवण्यासाठी तिने केलेल्या प्रयत्नाचे सर्व स्तरातून आता कौतक होत आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘hello news’

Leave a Comment