Saturday, June 3, 2023

कोरोनामुक्त होण्यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्र्यांचा गजब सल्ला….

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : कोरोनापासून सुटका मिळावी तसेच त्याचा आपल्यावर प्रादुर्भाव होऊ नये म्हणून प्रत्येक्जण अनेक उपाय शोधत आहेत. अशात कोरोनामुक्त होण्यासाठी कोणता आहार घ्यावा. काय खाल्ले तर या आजारापासून मुक्त होऊ याचीही माहिती नागरिकांना मिळणे गरजेची आहे. अशात आता केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी गजपचा सल्ला दिला आहे. स्वत:ला कोरोनमुक्त ठेवण्यासाठी रोगप्रतिकारशक्ती वाढविणारा आहार घ्यावा आणि तणाव मुक्तीसाठी डार्क चॉकलेट खावे,असा सल्ला डॉ. हर्षवर्धन यांनी दिला आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांनी नुकतीच आपल्या ट्विटरवरून याबाबत माहिती दिली आहे. त्यांनी ट्विट करत रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी काय आहार घ्यावा हे सांगितले आहे. डॉ. हर्षवर्धन यांनी शरीरातील प्रोटीन्ससाठी चिकन, मासे, अंडी, पनीर, सोयाबीन, शेंगदाणे यांचा आहारात समावेश करावा. फॅट्ससाठी अक्रोड, बदाम, ऑलिव्ह, मोहरीचे तेल खावे तसेच हळदयुक्त दूध प्यावे, असे हर्षवर्धन यांनी आपल्या ट्विटरमध्ये सांगितलंय.

केंद्रीय आरोग्यमंतरी डॉ. हर्षवर्धन यांनी डार्क चॉकलेट खाण्याचा सल्ला दिल्यानंतर याबाबत पुण्यात आणि भोपाळमध्ये संशोधन करणारे अनंत भान यांनी काही प्रश्न उपस्थित केले आहेत. डार्क चॉकलेट खाल्ल्याने कोरोनाच्या स्ट्रेसवर मात करता येते याला आधार काय? असा प्रश्न डॉ. हर्षवर्धन यांना त्यांनी विचारला आहे. संशोधक अनंत भान यांच्या मते डार्क चॉकलेट घेणं किती लोकांना परवडणार आहे.