निकोलस पूरनच्या जबरदस्त फिल्डिंगचा हा व्हिडिओ तुम्ही पाहिलात का?

सचिन, सेहवाग यांनिही केले कौतुक

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | शारज्याच्या मैदानात राजस्थान रॉयल्सने षटकार आणि चौकांराची आतिषबाजी करत आयपीएलच्या इतिहासातील सर्वोच्च धावसंख्येचा यशस्वी पाठलाग केला. पंजाबने विजयासाठी २२४ धावांचे आव्हान राजस्थानने ४ गडी राखत पूर्ण केलं. अष्टपैलू राहुल तेवतिया राजस्थानच्या विजयाचा हिरो ठरला. शेल्डन कोट्रेलने टाकलेल्या १८ व्या षटकात तेवतियाने ५ षटकार मारत सामन्याचे चित्र पूर्णपणे बदलले. एक क्षणी पंजाब सामन्यात बाजी मारेल असं वाटतं असतानाच तेवतियाने फटकेबाजी करत सामना राजस्थानच्या बाजूने झुकवला.

पण यामध्ये सर्वांचे लक्ष वेधले ते पंजाबचा फलंदाज निकोलस पूरनने केलेल्या क्षेत्ररक्षणामुळे. आठव्या षटकात तिसऱ्या चेंडूवर संजू सॅमसनने दणदणीत शॉट मारला. हा षटकारच होता. मात्र, सीमारेषेवर क्षेत्रक्षण करणाऱ्या निकोलसने हवेत उडी मारत कॅच घेतला, त्याचवेळी पुरनचा तोल गेला, प्रसंगावधान दाखवत त्याने चेंडू सीमारेषेच्या आता फेकला. पूरनने केलेलं क्षेत्ररक्षण पाहून पंजाबचा फिल्डिंग कोच जॉंटी ऱ्हॉड्सने उभे राहत त्याचे कौतुक केलं. तसेच त्याच्या या क्षेत्र रक्षणामुळे समाज माध्यमात धुमाकूळ घातला आहे.

सचिन तेंडुलकर, विरेंद्र सेहवाग, रितेश देशमुख यांनी सुद्धा पूरनचे कौतुक केले

निकोलस पूरनची ही फिल्डींग पाहून भारताचा माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरही चांगलाच भारावला. आतापर्यंत मी पाहिलेली ही सर्वोत्तम फिल्डींग असल्याचं सचिनने म्हटलं आहे.

तसेच पूरनच्या फिल्डिंगने ग्रेव्हिटी नावाची गोष्टच विसरायला लावली असं सेहवागने म्हटलंय. तर रितेश देशमुखने अशी फिल्डिंग आपण इतिहासात पहिल्यांदाच पाहिल्याचं म्हटलंय.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

You might also like