दिलासादायक ! Tata Steel ने मेडिकल ऑक्सिजनचा पुरवठा वाढवला, आता दररोज 600 टन ऑक्सिजन पुरवणार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर देशाची राजधानी दिल्लीसह (Delhi) अनेक राज्यात मेडिकल ऑक्सिजनची (Medical Oxygen) कमतरता आहे. अशा परिस्थितीत, अनेक कंपन्या कोरोना संक्रमणामुळे प्रभावित झालेल्या राज्यांना ऑक्सिजन पुरवठा (Oxygen Supply) केला जात आहे. आता टाटा स्टीलने (Tata Steel) म्हटले आहे ,”की कोविड -19 रूग्णांच्या उपचारासाठी त्यांनी डेली ऑक्सिजनचा पुरवठा 600 टन्सने वाढविला आहे. मंत्रालयाच्या सूचनेनुसार देशातील स्‍टील प्‍लांट्स (Steel Plants) विविध राज्यांना मेडिकल ऑक्सिजनचा पुरवठा करीत आहेत. यावेळी देशभरात रुग्णांच्या उपचारासाठी ऑक्सिजनची मोठी कमतरता आहे.

‘लोकांचे प्राण वाचवण्यासाठी केंद्राबरोबर एकत्र काम करणे’
टाटा स्टीलने एका ट्विटमध्ये म्हटले आहे की,” कंपनीने डेली लिक्विड मेडिकल ऑक्सिजनचा पुरवठा 500-600 टन पर्यंत वाढविला आहे. ऑक्सिजनची उपलब्धता वाढवण्यासाठी आणि लोकांचे जीवन वाचवण्यासाठी आम्ही केंद्र सरकार आणि राज्यांबरोबर काम करत आहोत.” गेल्या आठवड्यात टाटा स्टीलच्या प्रवक्त्याने सांगितले की,”कंपनी दररोज विविध राज्यात 300 टन लिक्विड वैद्यकीय ऑक्सिजन पुरवते आहे. केवळ टाटाच नाही तर अनेक स्टील प्‍लांट्सनी त्यांची उत्पादन क्षमता दुप्पट केली आहे.”

उपलब्ध टँकरना मेडिकल ऑक्सिजन टँकरमध्ये रुपांतरित करणे
स्टील कंपन्यांनी राज्यांना ऑक्सिजन लवकरात लवकर पुरवण्यासाठी नायट्रोजन आणि एर्गन टँकरना लिक्विड मेडिकल ऑक्सिजन टँकरमध्ये रूपांतरित केले. कंपन्यांनी 8345 मेट्रिक टन क्षमतेसह 765 नायट्रोजन आणि 7642 मेट्रिक टन क्षमतेसह 434 एर्गन टँकर लिक्विड मेडिकल ऑक्सिजनमध्ये रूपांतर केले आहे. पेट्रोलियम अँड एक्सप्लोसिव्ह सेफ्टी आर्गेनायझेशनने टँकर बदलण्यास परवानगी दिली आहे. राज्यांना लिक्विड मेडिकल ऑक्सिजनच्या पुरवठ्यासाठी 15,900 मेट्रिक टन क्षमतेसह 1,172 टँकरमध्ये आवश्यक बदल केले गेले आहेत.

राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group

Leave a Comment